भंडारा जिल्ह्यातील दुर्दैवी अग्नितांडवाची चौकशी होऊन कठोर कारवाई होणार..!

| भंडारा | भंडारा जिल्हा रूग्णालय आगप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या घटनेत १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

राज्याला हादरवणारी घटना ही काल रात्री २ वाजता घडली. नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात आग लागल्याने १० बालकांना मृत्यू झाला आहे. तर ७ बालकांना वाचवण्यात आलं आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजता ही आग लागली. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आऊटबोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं समोर आलं. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नर्सने दरवाजा उघडून पाहिला असता खोलीत मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आलं. या आगीत आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेली सात बालकांना वाचवण्यात आलं. पण आऊट बॉर्न युनिटमधील १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. राज्यमंत्र्यांना तातडीने भंडाऱ्यात जाण्याचे आदेश राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोणत्याही हलगर्जीपणावर कठोर कारवाई होईल असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *