| ठाणे | जन्मताच हृदयाची बाजू डावीकडे असते. मात्र जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील एका छोटयाशा गावात राहत असलेल्या युग महाजन या 18 महिन्याच्या बालकाचे हृदय उजव्या बाजूला असल्याचे त्याच्या पालकांचा लक्षात आले. त्यामुळे त्रास होत असल्याने युगचे वडील प्रवीण महाजन यांनी जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी मुलाच्या उपचारासाठी धावपळ केली.
https://twitter.com/thelokshakti/status/1443186835384012805?s=19
मात्र मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये उपचार केल्यावाचून पर्याय नाही असे तेथील तज्ञ डॉक्टरांनी सांगितले. छोटासा छायाचित्रकाराचा व्यवसाय करणाऱ्या आपल्याला मुंबईतील रुग्णालयांचा खर्च आणि उपचार परवडतील का अशा विवंचनेत असलेल्या प्रवीण महाजन यांची भेट कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी झाली. डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही 18 महिन्याच्या युग महाजनची संपूर्ण आरोग्यविषयक माहिती तातडीने घेऊन त्याच्या शस्त्रक्रियेसाठी हालचाली सुरू केली. बाई जेरबाई वाडिया बालकांच्या रुग्णालयाचे प्रमुख डॉ. निरंजन गायकवाड यांच्याशी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी चर्चा केली. कंजेनिटल डायफ्रॅगमॅटिक हर्निया ही शस्त्रक्रिया करावी लागणार होती. शस्त्रक्रियेसाठी साधारणता साडे तीन ते चार लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. घरची बेताची परिस्थिती पाहून महाजन यांना यांच्यासमोर पैशांच्या जमवाजमव करण्याचे संकट उभे होते. मात्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा उपचाराचा खर्च अगदीच शून्यावर आणून प्रवीण महाजन यांच्या बालकाचे उपचार केले.
शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर युग बाळाने आपल्या आई-वडिलांसोबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. यावेळी आकाश श्रीकांत शिंदे यांनी योग्याची आरोग्यविषयक विचारपूस केली. यावेळी महाजन कुटुंबीयांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या मतदारसंघातले नसतानाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आम्हाला जे सहकार्य केले ते आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. डॉ. शिंदे यांच्यामुळेच आज आम्ही आमच्या बाळासोबत आहोत, अशी भावनिक प्रतिक्रिया प्रवीण महाजन यांनी यावेळी दिली.