नाशिकमधून उमेदवारी न मिळाल्यास हेमंत गोडसे टोकाचा निर्णय घेणार..?…

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीत कायम आहे. भाजपने नाशिकच्या जागेसाठी आग्रही मागणी केली. आता बडगुजरांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
 
सुधाकर बडगुजरांचा मोठा गौप्यस्फोट…..

नाशिकच्या सिन्नर मधील ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘हेमंत गोडसेंचे तिन माणसे माझ्याकडे येऊन गेली.

आम्हाला पदरात घ्या म्हटले पण मी त्यांना सांगितलं गद्दारांना माफी नाही, आता वेळ निघून गेली तुम्ही तुमच्या पक्षात परत जा आणि समोरून लढा, असे वक्तव्य सुधाकर बडगुजर यांनी केले आहे.

महायुतीकडून नाशिकच्या जागेचा तिढा कायम असतांनाच बडगुजरांचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. हेमंत गोडसे टोकाचे पाऊल उचलणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *