आशिष कुडके :- लोकसभा : मी जितकं इंग्रजी बोललो तितकं इंग्रजी पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं ते म्हणाले आहेत. त्यावर निलेश लंके यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
निलेश लंकेंचं प्रत्युत्तर…….“मी सामान्य कुटुंबातील मुलगा असून जिल्हा परिषद शाळेत शिकलो आहे. माझं कुटुंब सर्वसामान्य आहे. माझं कुटुंब मला शहरात, इंग्रजी मीडियममध्ये शिक्षण देऊ शकत नव्हतं. पण याचा अर्थ आम्ही राजकारण करु शकत नाही असा होत नाही. समाजकारण करताना भाषेचा प्रश्न येत नाही. मातृभाषेतून संसदेत प्रश्न मांडू शकतो,” असं प्रत्युत्तर निलेश लंके यांनी दिलं आहे.
रोहित पवारांची पोस्ट……..सुजय विखे पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवार यांनीही त्यांना सुनावलं आहे. “लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजतं की नाही हे महत्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत. नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱ्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाही. भाषा किंवा शिक्षण यावरुन कर्तृत्व सिद्ध होत नाही. टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो. पण याच