इंदापुरात देवेंद्र फडणवीस यांचा नवा डाव …. शरद पवारांचे खंदे समर्थक अजित दादांसाठी काम करणार ???
सोनाई डेअरी चे चेअरमन प्रवीण माने जाहीर करणार भूमिका ??

शुक्रवारी इंदापुरात महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडवण्यासाठी इंदापूर येथे आलेले देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते . हेलिकॉप्टर ने इंदापूर येथे आगमन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यासाठी आलेल्या लोकांतील एक चेहरा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. तो चेहरा होता सोनाई डेअरी चे चेअरमन प्रवीण माने यांचा ….

सोनाई डेअरी चे चेअरमन असलेले प्रवीण माने हे सुप्रिया सुळे समर्थक मानले जातात आणि सुप्रिया ताईंच्या प्रचारात देखील त्यांचा सहभाग होता . त्याच प्रवीण माने यांच्या फडणवीसांनी चहापान घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

प्रवीण माने यांच्या भेटीनंतर फडणवीस काय म्हणाले?

माने दादांशी माझे जुने आणि वैयक्तिक संबंध, ते अनेकवेळा माझ्या घरी येतात. ते बऱ्याच दिवसांपासून मागे लागले होते, तुम्ही इंदापूरला येता पण माझ्याकडे येत नाही. त्यामुळे मी कबुल केले होते, मी तुमच्याकडे चहा पिण्यासाठी येईन, त्यानुसार चहा पिण्यासाठी गेलो होते. ते आमच्यासोबतच आहेत, ते आमचे जुने सहकारीच आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र

प्रवीण माने जर अजित पवारांसोबत गेले तर इंदापुरात सुप्रिया सुळे यांना फटका बसू शकतो. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर फडणवीसांनी इंदापूरमध्ये आणखी एका अजित पवार विरोधकाला आपल्या बाजूने वळवल्यास लोकसभेला सुनेत्रा पवार यांना इंदापूरमधून मोठी आघाडी मिळू शकते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *