भारतीय ज्ञान व संस्कृती जगाला दाखवून देणारे रणजितसिंह डिसले हे तर दुसरे विवेकानंद – नवनाथ धुमाळ

| अहमदनगर | युनेस्को आणि लंडन स्थित वार्की फाउंडेशन यांच्या ग्लोबल टीचर या सन्मानासह सात कोटी रुपयांचे पारितोषक मिळविणारे रणजित सिंह डिसले यांचा १२ जानेवारी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सन्मान १२ युवकांच्या उपस्थितीत हॉटेल सुवर्णप्राइड येथे पार पडला.

यानिमित्त डिसले यांना स्वामी विवेकानंदाचा पुतळा भेट देण्यात आला. यावेळी बोलताना हॉटेल सुवर्ण प्राइडचे मालक एन बी धुमाळ म्हणाले की सोलापुरातील परितेवाडी या छोट्याश्या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्यापन करताना डिसले सरांनी अनोखे उपक्रम राबवत यापुर्वीही लक्ष वेधुन घेतले होते. ग्लोबल टीचर पारितोषकाची निम्मी रक्कम उर्वरित स्पर्धकांना देण्याचा तसेच अन्य रक्कम शिक्षणासाठी वापरण्याचा त्यांचा निर्धार वैश्विक दृष्टिकोन परिचय देणारा तसेच भारतीय ज्ञान व संस्कृती जगाला जगाला दाखवुन देणारा आहे. स्वामी विवेकानंद व रणजित यांच्यामध्ये हे साम्य आहे. मला त्यांच्यामध्ये विवेकानंद दिसतो, अश्या व्यक्तीचा सन्मान आजच्या विवेकानंद जयंती निमित्त करून खऱ्या अर्थाने विवेकानंद जयंती साजरी झाली अश्या सार्थ शब्दात गौरव नवनाथ धुमाळ यांनी केला.

यावेळी बोलताना प्रमोद झावरे म्हणाले की मित्रांनो आपण सारे रणजित सिंह डिसले होऊया, तोही आपल्या सारखाच खेड्यातला हाडामासाचा शिक्षक आहे. हळु हळु शैक्षणिक तंत्रज्ञान शिकत गेला आणि वाडीतील विद्यार्थ्यांना विश्वासी जोडत गेला. आपणही त्यांच्यासारखेच आहोत. जे त्याला जमते ते आपल्यालाही जमु शकते. हा दृढ निर्धार करुया आणि महाराष्ट्र हा सुंदर देश विश्वातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र घडवुया. जग सुंदर घडवुया. माऊलींच्याच शब्दात सांगायचे तर
जे खळांची व्यंकटी सांडो|
तया सत्कर्मीरती वाढो |
भुता परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥
हा पुर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांचा खास संदेश या कार्यक्रमात प्रमोद झावरे यांनी सांगितला. तसेच आदर्श शिक्षक मंगेश खिलारी पाटील यांच्या मनातील नियोजन स्पष्ट केले की , पारनेर तालुका हा महाराष्ट्राला शिक्षक पुरविणारा तालुका असुन भविष्यात पारनेर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनाच्या वतीने मा .पद्मभुषण अण्णासाहेब हजारे, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार कार्यक्रम रणजित सिंह डिसले यांचा घेण्यात येईल त्या कार्यक्रमाला येण्याचा शब्द प्रमोद झावरे यांनी डिसले यांच्याकडुन घेतला.

सदरील कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक सेवा संघ यांनी केला होता. सदरील कार्यक्रमास सुवर्ण प्राईडचे मालक महेश धुमाळ, इंजी. विजयकुमार पादीर, राजेंद्र जगताप , शिक्षक नेते अंबादास गारुडकर, शिक्षक सेवा संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब देंडगे, प्रदीप तांदळे , प्रवीण देशमुख, मोहन पवार, वैभव चव्हाण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *