| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | : रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली चे माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांना आंतरराष्ट्रीय रोटरी तर्फे या वर्षाचा “सर्विस अबाउ सेल्फ”हा सर्वोच्च बहुमान असणारा पुरस्कार डिस्ट्रिक्ट (3030) चे प्रांतपाल रमेश मेहेर यांनी जाहीर केला. सदर पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय रोटरी स्तरावर देण्यात येत असून यावर्षी भारतातून नऊ लोकांची निवड झाली असून त्यात खानदेश विभागाचे रत्न भुसावळचे राजीव शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण जगभरातून दरवर्षी किमान 125 लोकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते राजीव शर्मा यांची निवड त्यांच्या कार्य कर्तुत्वामुळे तसेच त्यांनी रोटरी क्लब मध्ये दिलेल्या विविध सेवा आणि विविध पदावर केलेले कार्य लक्षात घेता जवळपास साडे सातशे ते आठशे केलेल्या नामांकनातून त्यांची निवड होणे हे गौरवास्पद आहे. सदर पुरस्काराचं वितरण लवकरच संपन्न होणार आहे.
माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांचा रोटरी चा प्रवास हा 1994 पासून सुरु झाला या तीस वर्षाच्या त्यांच्या रोटरीच्या कारकिर्दीत अध्यक्ष पासून ते प्रांतपाल पर्यंत विविध पदांवर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. आज पावेतो त्यांनी 35 ग्रंड मॅचींग प्रोजेक्ट 20 ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट यशस्वी रित्या समाजासाठी पूर्ण केलेले आहे. जवळपास या प्रोजेक्टचे निर्धारित तत्कालीन मूल्य 1 करोड अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 75 करोड रुपये) होते. संबंधित प्रकल्प हे भारतात तथा भारताच्या बाहेर आजही सेवारत आहे. याचा फायदा लाखो लोकांना जगभरात होत आहे या कार्य अंतर्गत त्यांनी ब्लड बँक, मदर मिल्क बँक , आय बँक, स्किन केअर सेंटर ,नवजात शिशु केअर सेंटर इत्यादींची स्थापना केली. महिलांच्या सुदृढ आरोग्य साठी मॅमोग्राफी बस सुरू केली असून भारतातील रोटरीच्या जवळपास सहा पेक्षा जास्त डिस्ट्रिक मध्ये हजारो महिलांची चाचणी केली जात आहे ई लर्निंग स्कूल, हॅप्पी स्कूल ,शाळा मध्ये मुले आणि मुलींसाठी स्वच्छतागृहे यांची निर्मिती यासाठीदेखील त्यांनी रोटरीच्या माध्यमातून भरीव कार्य केलेले आहे तसेच रोटरीच्या कार्यासाठी जवळपास 25 हजार अमेरिकन डॉलरचे ते डोनर आहेत. डिस्ट्रिक 3030 चे आर्च क्लब सोसायटी सदस्य होण्याचा प्रथम अनमोल बहुमान त्यांनी मिळवला आहे. पोलिओ निर्मूलन असो व कोविड लसीकरण यात सातत्याने सेवा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय रोटरीच्या प्राधान्य असलेल्या प्रमुख क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. झोपेच्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून त्यांनी रोटरीच्या विविध क्षेत्रातल्या कार्याला गतिमान करण्याचे ध्येय उराशी बाळगलेले आहे. उत्कृष्ट टीम लीडर अभ्यासक प्रमुख वक्ता रोटरीचा प्रगल्भ विचारांचा मार्गदर्शक म्हणून ते नावलौकिक आहेत. विविध सुविधा रोटरीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या खबरदारी व जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतात. ते रोटरी फाउंडेशन (TRF)चे आंतरराष्ट्रीय रिजनल कॉर्डिनेटर आहेत. डिस्टींग्विश सर्विस अवार्ड यांना गतवर्षी प्रदान करण्यात आला होता.
अशा बहूमुखी आयामी व्यक्तिमत्त्वातच विविध रोटरी क्लब तथा सामाजिक संस्था त्यांचं अभिनंदन करीत आहेत. रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष डॉक्टर संजू भटकर व सेक्रेटरी जीवन महाजन यांनी संपूर्ण ताप्ती व्हॅली क्लबच्यावतीने त्यांचा यथोचित सन्मान सत्कार केला.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .