जळगावातील गोंडगाव मधील कोरोना योद्धे संजय सोनार कळवाडीकर यांचा अहमदनगर येथे विशेष सत्कार…!

| जळगाव – अहमदनगर | गेल्या 22 मार्च 2020 पासुन कोरोनाच्या संकटाशी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी फ्रंट लाईन वर्कर म्हणुन दिवस-रात्र लढत आहे. कोरोनाच्या काळात अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधीत झाले. तसेच अनेक शहीदही झाले. परंतू अशा परिस्थितीतही हे अधिकारी व कर्मचारी कोरोना नियंत्रणाकरिता अविरत कार्य करीत असल्याने अशा कोरोना योध्यांचा महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना शाखा अहमदनगर यांच्या वतीने डाँ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कार्यालय, अहमदनगर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

दरम्यान सदर सत्कार हा अहमदनगर जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा होता. ह्या कार्यक्रम अंतर्गत गोंडगाव येथील आरोग्य सेवक तथा कोरोना योद्धे संजय सोनार कळवाडीकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कोरोना काळात सोनार यांनी केलेले कार्य निश्चितच वाखणण्याजोगे असुन त्यांचा सन्मान होणे गरजेचे होते, म्हणुन अहमदनगर जिल्ह्या व्यतिरिक्त फक्त सोनार यांचाच सन्मान केला आहे, अशी माहीती संघटनेचे सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप यांनी दिली.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी.डी गांडाळ उप-संचालक आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक हे होते, तर प्रमुख उपस्थितांमध्ये अहमदनगर जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रविंद्र कानडे, अहमदनगर महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, सहाय्यक हिवताप अधिकारी संजय सावंत, साथ-रोग अधिकारी दादासाहेब साळुंके, मध्यवर्ती संघटना अहमदनगरचे अध्यक्ष तळेकर सुभाष, सरचिटणीस रावसाहेब निमसे, कार्याध्यक्ष डॉ. मुकुंद शिंदे, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर डिसले, सचिव संजय दुस्सा आदी उपस्थित होते. सदर सन्मान डॉ. पी.डी.गांडाळ उप-संचालक आरोग्य सेवा,नाशिक यांच्या हस्ते करण्यात आला.

सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास ढगे, सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप, सह-कार्याध्यक्ष जनक बागल, उपाध्यक्ष अरुण लांडे, वाडेकर व्ही.बी, भागवत जी.के, टकले पी.बी, गायकवाड ए.एस, कोषाध्यक्ष वैभव चेन्नुर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम आडेप व प्रसाद टकले यांनी केले तर बाळासाहेब नवगिरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *