जो बायडेन यांच्याकडून भारतीयांसाठी अभिमानाची नियुक्ती…! नासाच्या मुख्यपदावर नियुक्ती..

| नवी दिल्ली | भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या परिक्षम मसितीच्या सदस्य म्हणून निवडलं आहे. यासंदर्भात नासानेही एक पत्रक जारी करत भाव्या यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. भाव्या यांची नियुक्ती ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. व्हाइट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये भाव्या यांच्याबरोबरच नासामधील इतर प्रमुख पदांवरील नियुक्त्यांचीही घोषणा करण्यात आली आहे.

भाव्या यांना अभियांत्रिकी आणि अवकाश संशोधन या दोन्ही क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा दांडगा अनुभव आहे. मात्र भाव्या यांच्यावर अशी महत्वाची जबाबदारी टाकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी भाव्या नाच्या इनोव्हेटिव्ह अ‍ॅडव्हान्स कॉन्सेप्ट्स प्रोग्रॅम म्हणजेच नवीन संकल्पनांवर काम करण्यासंर्भातील उपक्रम आणि अ‍ॅडव्हायझरी काऊन्सीलसाठी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पा आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या सदस्य देखील होत्या.

भाव्या यांनी स्पेस टेक्नोलॉजी क्षेत्रामध्ये मागील दीड दशकांहून अधिक काळ काम केलं आङे. तसेच त्या इन्स्टीट्यूट ऑफ डिफेन्स अ‍ॅनालिसिस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी पॉलिसी इंन्स्टीट्यूटमध्ये (एसटीपीआय) रिसर्च स्टाफ म्हणून २००५ ते २०२० दरम्यान कार्यरत होत्या. एसटीपीआय मध्ये सहभागी होण्याअगोदर त्या सी-सटीपीएस एलएलसीच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्यापूर्वी भाव्या यांनी केंब्रिजमधल्या मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राचे संचालक पद भूषवलं आहे. अमेरिकेच्या न्यूक्लिअर सोसायटीच्या अण्वस्त्रविषयक वार्षिक परिषदेच्या अध्यक्षस्थानीही भाव्या यांची नियुक्ती करण्यात आली होती.

अंतराळ क्षेत्रातील संशोधनामध्ये भाव्या यांनी मोठं योगदान दिलं आहे. आंतरराष्ट्रीय अकॅडमी ऑफ अ‍ॅस्ट्रोनॉटिक्सच्या प्रतिनिधी म्हणूनही त्यांची निवड झाली होती. अणू विज्ञान म्हणजेच न्यूक्लिअर सायन्स या विषयात भाव्या यांनी बीएससी आणि एमएसस्सीपर्यंतचे शिक्षण घेतलं आहे. इतकचं नाही तर सार्वजनिक प्रशासन या विषयामध्येही भाव्या यांनी डॉक्टरेटचं शिक्षण घेतलं आहे. विज्ञान विषयक अनेक कार्यक्रमांच्या आणि संस्थांचं प्रमुख पद भूषवणाऱ्या भाव्या यांच्यावर आता थेट नासाच्या कार्यकारी प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भाव्या लाल या नासामधील वरिष्ठ आर्थिक सल्लागार म्हणूनही काम पाहणार आहे. कोणत्या अंतराळ मोहिमांसाठी किती खर्च करण्यात यावा याचसोबत इतर आर्थिक सल्ले देण्याची जबाबदारी आता भाव्या यांच्या खांद्यावर असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *