
| जालना | अवैध वाळू उपसाबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे वाळूमाफियांनी जाफराबाद येथील दै. पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा जाहिर निषेध करत हल्लेखोर वाळूमाफियांवर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याद्वारे कठाेर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय मंठा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने [ता.१४] सोमवार रोजी तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी तहसीलदार सुमन मोरे व पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांनी निवेदन स्विकारले.
जाफ्राबाद येथील पत्रकार पाबळे यांनी अवैध वाळू उपसा याविषयी लिखाण केल्यामुळे वाळू माफियांनी पाबळे यांच्यावर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पाबळे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथील रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाई यावी, असे निवेदनात नमुद केले आहे. यावेळी दिनेश जोशी,नागेश कुलकर्णी, कृष्णा भावसार, प्रदीप देशमुख,राजेभाऊ भुतेकर, बाबुजी तिवारी, रणजित बोराडे, हाफेज शबाब बागवान, अतुल खरात यांची उपस्थिती होती.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!