जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी होणार भव्य आंदोलन, राज्यातील कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीची ऑनलाईन सभा संपन्न..

| मुंबई / नागपूर | जुनी पेन्शन योजना लागू करून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा निर्धार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी राज्यातील विविध संघटनांच्या एकत्र दूरदृश्य प्रणाली आयोजित बैठकीत केला आहे. यावेळी खांडेकर म्हणाले की, तरुण तुर्क कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी राज्यातील सर्व प्रवर्ग कर्मचारी संघटना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी भव्य आंदोलन उभारणार असून जुनी पेन्शन लढ्यासाठी राज्यातील सर्व संघटना एकत्र आणणार त्या माध्यमातून येत्या नागपुर हिवाळी अधिवेशनावर जुनी पेन्शन आंदोलनाची त्सुनामी धडकणार आहे.

दि. 10 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटननेने राज्यातील सर्व कर्मचारी संघटनांचे राज्य पदाधिकारी यांच्या ऑनलाईन गुगल मीटचे आयोजन राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती विभागीय अध्यक्ष तथा अन्य विभाग कर्मचारी संघटना सक्षमीकरण समिती प्रमुख मिलींद सोळंकी यांच्या पुढाकाराने केले होते. तब्बल 03 तास चाललेल्या या सभेत सर्वांनी आपले मत मांडत, समन्वय समितीच्या नावाने जुनी पेन्शनचा लढा उभारला जावा असा सुर उमटला. संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली जुनी पेंशनसाठी भविष्यात सर्वांना एकत्र करून गरज पडल्यास सर्व कर्मचारी समन्वय समिती स्थापन करून जुनी पेंशनसाठीचे राज्यव्यापी आंदोलनं करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सहभागी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मत मांडताना व्यक्त केले.

आजवर संघटनेने अनेक राज्यव्यापी आंदोलने केली, पण त्या आंदोलनात इतर विभागाचे कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभाग पाहिजे तेवढा दिसत नव्हता. त्यामुळे शासन आपल्या मागणीची दखल घेताना शिक्षक आणि इतर कर्मचारी यांच्या लढ्याबाबत उलट प्रश्न विचारताना दिसत होते, त्यामुळे भविष्यात सर्व संघटनांनी एकत्र येऊन समन्वय समिती स्थापन करूनच प्रत्येक आंदोलनात राज्यातील 100 टक्के कर्मचारी सहभागी होतील याचे नियोजन करूनच पुढे जाण्याची गरज असल्याचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी सांगितले.

याप्रसंगी लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ राज्याध्यक्ष शालीक माऊलीकर, राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना राज्य उपाध्यक्ष नंदकुमार बुटे, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष गिरीश दाभाडकर, मध्यवर्ती कर्मचारी संघटना राज्य कोषाध्यक्ष गणेश देशमुख, सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती राज्य निमंत्रक मधुकर काठोळे, आरोग्य सेवा कर्मचारी संघटना राज्य सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, आरोग्य विभाग कर्मचारी संघटना समन्वय समितीचे अरुण खरमाटे, पेन्शन बचाव कृती समिती राज्याध्यक्ष संजय येवतकर, लिपिक संवर्ग हक्क परिषद राज्य सचिव उमाकांत सुर्यवंशी, भारतीय कामगार सेना संलग्न महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघ राज्य उपाध्यक्ष अविनाश भुजबलराव, वनरक्षक संघटना वनपाल शैलेंद्र भदाने, शिक्षक महासंघ संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर, विदर्भ प्रांत महसुल कर्मचारी संघटना आशिष जयसिंगपुर, महाराष्ट्र कोषागार अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रमोद पोहेकार, कृषी विभाग कर्मचारी संघटना राज्य संपर्क प्रमुख शिवाजी कोरडे, वनपाल वनरक्षक संघटनाचे महासचिव इंद्राजत बारस्क, अनंता वायझाड, मंगेश शिरसाट, महाराष्ट्र राज्य परिचारक संघटनेचे अभय सिंग राजपुत हे उपस्थित होते. दरम्यान दूरदृश्य प्रणाली द्वारे सभेचे सूत्रसंचालन मिलिंद सोळंके समिती प्रमुख अन्य विभाग कर्मचारी संघटना सक्षमीकरण समिती यांनी केले. प्रास्तविक महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नामदेव मेटांगे दादा यांनी केले. संघटनेची आंदोलन बाबतची पुढील माहिती आंदोलन समिती प्रमुख नदीम पटेल यांनी दिली. आभार प्रदर्शन महाराष्ट्र राज्य कोषागार अधिकारी कर्मचारी संघटना प्रमोद पोहेकर यांनी केले.

तसेच यावेळी सुनील दुधे, आशुतोष चौधरी, प्राजक्त झावरे पाटील, शैलेश राऊत, नदीम पटेल, रामदास वाघ, गौरव काळे, निलेश कानडे, नंदू सुसर, गोपाळ लोखंडे, अतुल कडू, बालाजी मोटे, श्याम दाभाडकर, प्रवीण बहादे, संजय सोनार इत्यादी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनाचे राज्य पदाधिकारी उपस्थित होते. राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी समन्वय सभेचं आयोजन करून पुढील रणनिती ठरवणार असल्याची माहिती अन्य विभाग कर्मचारी संघटना सक्षमीकरण समिती चे प्रमुख मिलिंद सोळंके यांनी दिली. राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी समन्वय समितीची बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख बालाजी मोटे यांनी माध्यमांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *