| नाशिक | कोविडच्या काळात अनेकांनी आपले प्राण गमावले या काळात आरोग्य कर्मचारी आणि सरकारी स्तरावरील सर्वांनीच उत्तम काम केले. या मोठ्या संकटात सरकारने चांगले काम केले तसेच या काळात सरकारकडे काम करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नव्हती अशा वेळेला लोकांच्या मदतीसाठी शिवसेनेचा वैद्यकीय कक्ष उभा राहिला. श्रीकांत शिंदेचे खास अभिनंदन करत, गेले वर्षभर मी काळजीपुर्वक त्यांचे काम पाहतो आहे असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. आपण ११ जिल्ह्यात पोहोचलो आणि वैद्यकीय क्षेत्रात काम केले. महाराष्ट्रात जेव्हा कोरोना संकट आले अशा वेळेला राज्यातील लोकांच्या कोणी मदतीला आले असेल तर ते शिवसेनेचा वैद्यकीय कक्ष असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. राऊत नाशिकमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी जनतेशी संवाद साधत होते. कोरोना काळात शिवसेने मोठे काम केले असल्याचेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राज्यात ११ जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्र
महाराष्ट्रात जेव्हा कोरोना संकट आले अशा वेळेला राज्यातील लोकांच्या कोणी मदतीला आले असेल तर ते शिवसेनेचा वैद्यकीय कक्ष असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. ११ जिल्ह्यात पोहोचणे आणि वैद्यकीय क्षेत्रात काम उभे करणे साधी आणि लहान गोष्ट नाही आहे. जर तुम्ही बिहारमध्ये गेलात तर तिकडे ५ जिल्ह्यातसुद्धा सरकारी रुग्णालय पाहायला मिळणार नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राज्यात ग्रामीण भागातील लोकांना शहरात उपचारासाठी यायला जमत नाही. नाशिकच्या ग्रामीण भागातील जनतेसाठी पुणे-मुंबईत उपचारासाठी यायला जमत नाही. त्यांच्या उपचारासाठी शिवेसेनेचे वैद्यकीय कक्ष उभे करण्यात आले आहे. शिवसेना सरकारमध्ये आहे परंतु शिवसेना स्वतंत्र काम करते आणि शिवसेना काय काम करते हे या वैद्यकीय कक्षाने दाखवले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासला तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक आवाहन केले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहानावर आज रक्त जेवढे हवे आहे त्याच्या शंभरपट जास्त रक्तसाठा रुग्णालयात उपलब्ध आहे. शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यामुळे हा रक्त साठा उपलब्ध झाला आहे. हेच जर इतर मुख्यमंत्र्यांनी केले असते तर त्यांनी रक्ताचा तुटवडा दूर केला असता परंतु मोठ्या प्रमाणात रक्ता उपलब्ध करुन दिले नसते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनामुळे गावा-गावांत आणि शहरांत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. ही शिवसेनेची ताकद आहे.
मधल्या काळात काम थोडे काम झाले. वैद्यकीय कक्षाचे काम यापुढे आपल्या देशात आणि राज्यात कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे. कुठलातरी कोरोना गेला आता त्याच्यावरुन भयंकर कुठलातरी कोरोना आल्याचे बोलले जात आहे. हे कुठपर्यंत चालणार, अशा वेळेला आपले मन खंबीर पाहिजे, मनाने लढले पाहिजे औषधे वगेरे येत असतात. आता उपस्थित खूप जणांनी मास्क घातला नाही कारण त्यांचे मन खंबीर आहे. येऊद्या कोविड, कोविड-१९ काय करतोय येऊद्या टाकूया चिरडून, माझी मुलाखत जर मुख्यमंत्र्यांनी टीव्हीला पाहिले तर व्यासपीठावरुन खाली उतरण्याआधी ते चांगलीच चंपी करतील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री साहेब बोलतील तुम्हीच नियमांचे पालन करत नाही. सॉनिटायझर वापरत नाही. अशाने तुम्हीच कोरोनाचे नियम पायदळी तुडवत आहात. परंतु मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे. आता वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आम्ही मने सुद्धा खंबीर करतो आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .