ठळक मुद्दे :
✓ केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेद्वारे २७ गावांमध्ये पाणीपुरवठा करण्याच्या प्रत्यक्ष कामास गती
✓ कल्याण डोंबिवली मध्ये केंद्र शासन पुरस्कृत योजना राबविण्यासाठी; खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नांना यश
✓ ठाणे जिल्ह्यातील एमएमआर रिजन मधील २७ गावांमध्ये राबविणार केंद्र शासित पुरस्कृत अमृत योजना
✓ या आठवड्यात १० गावांमध्ये प्रत्यक्ष काम सुरु; उर्वरित गावांमधील काम देखील लवकरच होणार सुरु
| ठाणे | केंद्र शासनातर्फे लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी, स्वच्छ, शास्वत व पर्यावरणपूर्वक शहरे तयार करण्यासाठी अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अंड ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) या महत्वाकांक्षी अभियानाची घोषणा मा. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते दिनांक २५-६-२०१५ रोजी करण्यात आलेली होती. शहरातील रहिवाशांना पाणीपुरवठा, मलनिःसारण, नागरी परिवहन पुरवणे, शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा करणे, शहराच्या स्वच्छतेकरिता मलनिःसारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करणे, इतर सुविधांची निर्मिती करणे. केंद्र शासनामार्फत या अभियानाअंतर्गत राज्यातील ४३ क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या सुचनेनुसार राज्यातील ४३ क्षेत्रांमध्ये सदर अभियान राबविण्यात येणार असून त्यामधले एक क्षेत्र म्हणजे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे प्रतिनिधित्व करीत असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत होते आणि सदर योजना त्यांच्या मतदार संघात राबविण्यासाठी ते अथक प्रयत्नशील असून त्यास अखेर यश प्राप्त झाले आहे. त्यानुसार आता केंद्र शासन पुरस्कृत ‘अमृत’ अभियानांतर्गत २७ गावांकरिता पाणीपुरवठा योजना राबवली जाणार आहे. यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत या भागांकरिता ३३ जलकुंभ व त्यांना आवश्यक असलेल्या जलवाहिन्या व वितरण वाहिन्यांचा समावेश आहे. सदर योजनेअंतर्गत कल्याण – शीळ रस्त्यावर मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका डिमांड ड्राफ्ट रक्कम रुपये ३,९४,०४,०५१/- व पुढील तीन वर्षांकरिता बँक गॅरंटी द्वारे रक्कम रुपये ३,७४,०६,५६६ भरण्यास सांगितले होते, परंतु खासदार डॉ. शिंदे यांनी स्वतः उच्च स्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली; व सदरची अनामत शुल्क आकरणी माफ करून घेण्यातही त्यांना यश मिळाले आहे.
https://twitter.com/thelokshakti/status/1380063516887937026?s=19
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये येथील लोकसंख्या झपाट्याने वाढली असून याचा ताण नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यावर येत आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सन २०४९ पर्यंतच्या लोकसंख्येला पुरेल अशा प्रकारची सर्वंकष पाणी पुरवठा योजना तयार केली असून त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेअंतर्गत मंजुरीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठवला होता त्यास मंजुरी प्राप्त मिळाली असून एकूण १९४.२० कोटी रुपयांचा हा प्रस्ताव असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना पुरेशा दाबाने पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होणार असल्याची ही प्राथमिक माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. यामध्ये प्रकल्प वित्तपुरवठा केंद्र शासनाकडून ३३.३३% म्हणजेच ६४.७३ कोटी, राज्य शासनाकडून १६.६७% म्हणजेच ३२.३७ कोटी व कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन ५०% म्हणजेच ९७.१० कोटी इतका खर्च करणार आहे.
तसेच केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेद्वारे २७ गावांमधील आजदे, सागांव, गोळीवली, सोनारपाडा, माणगांव, काटई, हेदुटणे, देसलेपाडा, नांदिवली पंचानंद, मलंगरोड या १० गावांमध्ये सुरुवातीच्या काळात पाणीपुरवठा करण्याच्या प्रत्यक्ष कामास गती मिळणार असून उर्वरित गावांमध्ये देखील लवकरच काम सुरु करण्यात येईल असे खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्र शासन व राज्य शासन व महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .