कल्याण लोकसभा मतदार संघातील मनपांच्या विकासासाठी भरघोस निधीची तरतूद; खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश…!

ठळक मुद्दे : .

✓ नगरविकास विभागाकडून २०.०० कोटी रुपये मंजूर करून आणण्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश
✓ कळवा, मुंब्रा, दिवाकरिता रु.५.०० कोटी, कल्याण-डोंबिवली मनपासाठी रु. १०.०० कोटी, अंबरनाथ व उल्हासनगर नगरपालिकेकरिता ५.०० कोटी निधी मंजूर..
✓ मनपा क्षेत्रातील स्मशानभूमी, तलाव, उद्यान, चौक व सामाजिक सभागृह इत्यादींचा होणार कायापालट..

| ठाणे | कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा, मुंब्रा, दिवा, कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरातील विकासासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून तब्बल 20 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच मुलभूत सोयी सुविधा विकास लेखाशिर्षाखाली कल्याण लोकसभा मतदार संघातील सर्वच शहरासाठी 20 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यात महापालिका क्षेत्रातील स्मशानभूमी, तलाव, उद्यान, चौक सुशोभीकरण, सामाजिक सभागृह बांधणे अशी कामे केली जाणार आहेत. यात कळवा, मुंब्रा दिवा या शहरांकरिता 5 कोटी, कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी 10 कोटी तर अंबरनाथ, उल्हासनगर शहरासाठी 5 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

कल्याण लोकसभा मतदार संघातील सर्वच शहरांतील स्मशानभूमी, तलाव, उद्यान या वास्तूंना अधिक सक्षम करण्यासाठी निधीचा उपयोग करण्यात येणार आहे. झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात लोकसंख्याही वेगाने वाढते आहे. नवनव्या रहिवासी वस्त्या वाढत असल्याने पायाभूत सुविधांवर अवलंबून असणाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे. स्मशानभूमी आणि परिसरातील विविध वास्तू, अग्नीदहन वास्तू, शोकसभागृह, तेथील पाण्याची व्यवस्था, संरक्षक भिंती, स्मशानाकडे जाणारे रस्ते यांची सुधारणा करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. त्यासह शहरातील उद्यान आणि तलावांचे सौंदर्यीकरण या कामांसाठीही विविध लोकप्रतिनिधींनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला होता. अखेर या कामांसाठी नगरविकास विभागातर्फे मुलभूत सोयी सुविधा विकास या लेखाशिर्षाखाली 20 कोटी रूपयांचा निधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमुळे मुलभूत सोयी सुविधांमध्ये सुधारणा करणे सोपे होणार आहे. निधीची उपलब्धता झाली असून सर्वच विकास कामे प्राधान्याने लवकरात लवकर सुरू करणार असल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तसेच नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने आभारही व्यक्त केले आहेत.

निधीचे वाटप पुढीलप्रमाणे
कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध मुलभूत सोयीसुविधांसाठी नगरविकास विभागातर्फे मंजूर करण्यात आलेल्या 20 कोटी रूपयांच्या निधीपैकी 5 कोटी रूपयांचा निधी कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरांकरिता वापरला जाणार आहे. तसेच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 10 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला असून अंबरनाथ आणि उल्हासनगर या शहरांकरिता 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

असा होणार फायदा
कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरांमधील स्मशानभूमींचे नुतनीकरण शक्य होणार आहे. तेथे विविध सोयीसुविधा पुरवता येतील. नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी, विरंगुळ्यासाठी आवश्यक असलेल्या तलाव, उद्यान विकसीत करण्यासाठी मदत होणार आहे. चौक सुशोभीकरणासाठीही मदत होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी भव्य सामाजिक सभागृह बांधणे शक्य होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *