कल्याणकरांसाठी धावून आले आमदार विश्वनाथ भोईर, ऑक्सीजन प्लांट साठी मनपाला दिला १ कोटीचा निधी..!

| कल्याण | कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पुढाकार घेत महापालिकेचा स्वतःचा ऑक्सिजन प्लांट असावा या हेतूने 1 कोटींचा निधी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे वर्ग केला आहे.

सध्या पूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यात प्रामुख्याने ऑक्सिजनच्या तुटवड्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवली. अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपले प्राण गमवावे लागले. आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशाराही तज्ञांकडून देण्यात येत आहे. अशा वेळी ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करणे गरजेचे आहे. यासाठीच 1 कोटींचा विशेष निधी ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी महापालिकेकडे वर्ग करीत असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केले आहे.

लवकरच महानगरपालिका आपला स्वतःचा ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारेल आणि भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही अशी आशा आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *