| नवी दिल्ली | देशात खाद्य तेल, पेट्रोल-डिझेल आणि LPG गॅस सिलेंडर यांच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. यातच आता या महागाईच्या संकटात नागरिकांना औषधांसाठीही (Medicines) अधिकचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. सरकराने औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वार्षिक होलसेल प्राइस इंडेक्समध्ये (Wholesale Price Index) 0.5 टक्क्यांची वाढ करण्याची परवानगी दिली आहे, असे नॅशनल फार्मास्युटीकल प्रायसिंग अॅथॉरिटीने शुक्रवारी सांगितले आहे. त्यामुळे वेदना कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या, अँटिइन्फ्लाटीव्ह, कार्डियक आणि अँटिबायोटिक्ससह इतर आवश्यक औषधांच्या किमती एप्रिलपासून वाढण्याची शक्यता आहे.
औषधांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता
सरकारने औषध निर्मिती कंपन्यांना वार्षिक होलसेल किंमत इंडेक्सनुसार किमतींमध्ये बदल करण्याची परवानगी दिली आहे. ड्रग्स प्राइस रेगुलेटर, नॅशनल फार्मास्यूटिकल प्राइसिंग अॅथॉरिटीने शुक्रवारी सांगितले की, सरकारद्वारे 2020 साठी डब्लूपीआयमध्ये 0.5 टक्क्यांचा वार्षित बदल अधिसूचना आली आहे. तर फार्मा इंडस्ट्रीचे असे म्हणणे आहे की, मॅनिफॅक्चरींगच्या खर्चात 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे कंपन्या किमतीत 20 टक्के वाढीची योजना आखत आहेत. दरम्यान, औषध नियामकद्वारे डब्ल्यूपीआयनुसार अनुसूचित औषधांच्या किंमती वाढविण्यास दरवर्षी परवानगी दिली जाते.
कार्डिओ व्हॅस्क्युलर, डायबिटीज्, अँटिबायोटिक्स, एंटी-इन्फेक्टीव्हज आणि व्हिटॅमिनच्या निर्मितीसाठी बहुतेक फार्मा इन्ग्रीडीएंड (पदार्थ) चीनमधून आयात केले जातात, तर काही अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रीडीएंटसाठी (आयपीआय) चीनवर जवळपास 80-90 टक्के अवलंबून आहे. गेल्या वर्षाच्या सुरूवातीस चीनमधील कोरोना संकटामुळे पुरवठ्यातील अडचणींमुळे भारतातील औषध आयातदारांचा खर्च वाढला. त्यानंतर औषधांच्या किंमती 10 ते 20 टक्क्यांनी वाढविल्या होत्या. बहुतेक कच्चा माल चीनमधून पुरविला जातो
देशात औषधांच्या निर्मितीसाठी लागणारा बहुतेक कच्चा माल हा चीनमधूनच येत असतो. कोरोना महामारीमुळे या गोष्टीला मोठा फटका बसला आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील लोकांच्या म्हणण्यानुसार, औषध निर्मितीसाठीचा कच्चा माल जर्मनी तसंच सिंगापूरमधूनही येतो. मात्र, चीनच्या तुलनेत याठिकाणाहून आयात केल्या जाणाऱ्या मालाची किंमत जास्त असते. याच कारणामुळे बहुतेक कंपन्या चीनवरुन माल आयात करतात. अँटिबायोटिक गोळ्यांसाठी लागणारा बहुतेक कच्चा मालही चीनमधूनच आणला जातो. नुकतेच सरकारने हेपरिन इंजेक्शनच्या किमतीमध्येही वाढ केली आहे. याचा उपयोग कोरोनावरील उपचारासाठीही केला जातो. चीनमधून एपीआयच्या आयती करात झालेल्या वाढीनंतर सरकारने मागच्या वर्षी जूनमध्ये हेपरिनच्या किमतीत पन्नास टक्के वाढीला परवानगी दिली होती.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .