दिनांक 1 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4.00 वाजता शिवसेना जाहीर मेळावा व पक्षप्रवेश सोहळा शिवतीर्थ हॉल, पोसरी, ता. कर्जत या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाप्रसंगी श्री. हनुमानशेठ पिंगळे (कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
श्री. अक्षय सोनू पिंगळे (माजी पंचायत समिती सदस्य) श्री. विश्वनाथ पाटील (माजी सभापती खालापूर पंचायत समिती)
श्री. एच.आर. पाटील (माजी सभापती खालापूर पंचायत समिती)
श्री. निखील पाटील (युवासेना रायगड जिल्हा चिटणीस)
श्री. महेश पाटील.(शाखाप्रमुख खरीवली खालापूर) श्री भाऊ बाळू पवार (सरपंच बीड ग्रामपंचायत खालापूर) सौ नम्रता राकेश कुर्णुक पाटील (उपसरपंच बीड ग्रामपंचायत खालापूर) सौ.लक्ष्मी हरिभाऊ पवार (सदस्य बीड ग्रामपंचायत खालापूर)
श्री.सुनील दिसले व श्री.अक्षय दिसले (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते) श्री.राकेश देशमुख (सरपंच नारंगी ग्रामपंचायत) श्री.उध्दव देशमुख (नारंगी ग्रामपंचायत) श्री.शेखर जांभळे ( जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी रायगड) श्री प्रवीण गायकवाड ( शेकाप सामाजिक कार्यकर्ते)
श्री.अरुण गायकवाड (अखिल कामगार संघटना समन्वयक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) श्री.सिराज जळगावकर हाळ (युवक तालुका उपाध्यक्ष) श्री. जितू सकपाळ (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) श्री.अशोक माराजगे (उद्धव बाळासाहेब ठाकरे उपतालुकाप्रमुख) श्री वासुदेव भोसले (खरवई) सौ शुभांगी संतोष हडप (उपतालुकाप्रमुख महिला मनसे) श्री कृष्णा घाडगे (नगरसेवक) श्री अनिल सानप (उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशहर प्रमुख खोपोली) श्री अजय दिघे (उद्योजक) आधी कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
आमदार महेंद्र थोरवे हे जनसामान्यांचे असामान्य नेतृत्व आहे . कर्जत -खालापूर मतदारसंघात त्यांनी केलेले विकासकार्य बिनजोड असे आहे . कर्जत शहराचा तर त्यांनी कायापालट केला आहे . कर्जत शहरात उभारलेली विठू माऊलीची भव्य मूर्ती त्यांना सदैव आशीर्वाद देत राहील . श्री महेंद्र थोरवे यांच्या सहकार्याने मी जास्तीत जास्त उद्योग या मतदारसंघात आणण्याचा शब्द आज देतो – पालकमंत्री उदयजी सामंत
या कार्यक्रम प्रसंगी मावळ लोकसभा खासदार श्री श्रीरंग आप्पा बारणे यांनी आमदार महेंद्र थोरवे हे गेले पाच वर्ष आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी खूप चांगल्या प्रकारचे मेहनत घेत आहेत व त्यांनी मतदारसंघातील केलेलं काम हे उल्लेखनीय आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. व शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्या सन्मान दिला जाईल असा शब्द दिला.
या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले महाड चे विकासपुरुष लोकप्रिय आमदार श्री भरतशेठ गोगावले यांनीही आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या कार्याचा गौरव केला आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा थोरवे साहेबांचा स्वभाव इतरांना मार्गदर्शन करणारा आहे असे सांगून थोरवे साहेबांचे कौतुक केले
कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष व दोन वेळा कर्जत खालापूर विधानसभा लढवलेले नेते माननीय श्री हनुमान शेठ पिंगळे यांनी आता आम्ही आमच्या जुन्या घरी परत आलोय मी एकटा आलो नाही तर संपूर्ण माझं कुटुंब घेऊन आलो आहे व आपण मला पक्षात परत घेतलं त्याबद्दल आभार मानले व येणाऱ्या भविष्यकाळात निश्चितपणे आमदार श्री महेंद्र थोरवे यांना पुन्हा आमदार केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा शब्द दिला.
आम्ही हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे शिवसैनिक आहोत . अडीच वर्षे आधी माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जर महायुतीचे सरकार स्थापन झाले त्यात सहभागी होऊन बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मी एकप्रकारे मानवंदनाच दिली आहे – आमदार महेंद्र थोरवे
माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज माझे अनेक जुने सहकारी पुन्हा पक्षात प्रवेश करत आहेत याचा मला खूप आनंद आहे . मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब , पालकमंत्री श्री उदयजी सामंत तसेच मतदारसंघातील आणि सरकार मधील माझे सर्वच सहकारी यांच्या मुळेच मी कर्जत खालापूर मतदारसंघात भरीव निधी आणून विकासकामे करू शकलो . विरोधक कितीही बिनबुडाचे आरोप आणि वल्गना करत असले तरी त्यांना उत्तर हे फक्त विकासकामातून दिले आहे त्यामुळेच आज माझा मतदार माझ्या पाठीशी ठाम उभा आहे . महिला सशक्तीकरण आणि स्वावलंबी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेक्या सर्व निर्णयांचा मी माझ्या भगिनींना लाभ देऊ शकलो याचा मला अभिमान वाटतो .
शिवदूत आणि बूथ प्रमुखांच्या माध्यमातून अगदी प्रत्येक मतदारपर्यंत मी पोहोचू शकलो हे सर्व श्रेय माझ्या कार्यकर्त्यांचे आहे . कर्जत खालापूर मतदारसंघातील माझ्या कडवट शिवसैनिकांच्या ताकदीवर या मतदारसंघात पुन्हा एकदा भगवा डौलाने फडकणार यात कुठलीही शंका नाही
.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. शिल्पाताई देशमुख (शिवसेना)रायगड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख मा.श्री.संतोषजी भोईर ,शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसेना – युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना (कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघ ) व कर्जत खालापूर तालुक्यातील तमाम महिला उपस्थित होत्या.