खड्यात गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्यात घालण्याची भाषा करू नये; शिवसेना भाजपमध्ये खड्यांवरून जुंपली..

| मुंबई | मनसे आमदार राजू पाटील यांनी काल मलंगगड रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि पालिकेवर जोरदार टीका केली होती.

कल्याण-डोंबिवलीतील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्याबाबत पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावर 114 कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी खर्च केल्याचं दिसतंय का? असा प्रतिसवाल त्यांनी केला. खड्डय़ाचे सोडा पालिकेतील अधिकारी बिले काढण्यासाठी 2 टक्के घेतात. सगळीकडे अडवणूक, फसवणूक सुरू आहे. एक तर लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासक आहे. कशाला कशाचा पायपोस नाही. खड्डे बुजविण्यासाठी आठ वर्षात 114 कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी हीच परिस्थिती असते. त्यामुळे आता यांनी खड्डे भरावेत नाही तर आम्हालाच यांना खड्ड्यात भरावे लागेल, असा संतप्त इशारा त्यांनी दिला होता.

त्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये वाद वाढण्याची चिन्ह आहेत. कारण आज शिवसेनेने त्यावर पलटवार केला आहे. खड्ड्यात गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्ड्यात घालण्याची भाषा करू नये, असा इशारा शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे.

दीपेश म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मनसेवर जोरदार टीका केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 2010 सालच्या निवडणूकीत मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले होते. 2015मध्ये मनसेचे 9 नगरसेवक निवडून आले होते. त्यांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे मनसे हाच खड्ड्यात गेलेला पक्ष आहे. त्याने कोणाला खड्ड्यात घालण्याची भाषा करु नये, असा म्हात्रे यांनी दिला आहे. मनसेचेही नगरसेवक महापालिकेत होते. त्यावेळी त्यांनी का कधी खड्ड्यांवरून पालिकेत आवाज उठवला नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.

2014 साली महापालिका हद्दीत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामावर 21 कोटी रुपये खर्च केले जात होते. त्यानंतर महापालिका हद्दीत काही रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात आले. त्यामुळे 2014 सालानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा खर्च कमी कमी होत गेला आहे. रस्ते विकासासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे 360 कोटींची रस्ते विकासाची कामे लवकर सुरु होणार आहेत. त्यामुळे खड्डे बुजविण्यावरील खर्च आणखीन कमी होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

महत्वाची टीप : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून दैनिक लोकशक्ती ला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *