कोविड मधून बरे होताच, खासदार डॉ. शिंदे मैदानात, डोंबिवलीत कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे वाटप…!

| डोंबिवली / ठाणे | कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची तसेच ऑक्सिजन खाटांची उपलब्धता कमी पडत आहे. रुग्णांना रुग्णालयात दाखल होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत रुग्णांची ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात राहावी या दृष्टीकोनातून डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बँक योजना सुरू करण्यात आली आहे.

सदर योजनेचा लाभ कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरांतील कोरोना बाधित रुग्णांना घेता येणार आहे. या योजनेद्वारे कोरोनामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर द्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे.कल्याण-डोंबिवली मतदार संघातील गरजू रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी ऑक्सिजन बँक योजनेअंतर्गत आज डोंबिवली मध्यवर्ती शाखेमध्ये या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शहर प्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, तात्या माने विधानसभा संघटक , सदानंद थरवळ, विनिता राणे, विश्वनाथ राणे, संजय पावशे, राहुल म्हात्रे, दीपेश म्हात्रे, एकनाथ पाटील उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *