लसीकरण करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही, UIDAI ने केले स्पष्ट..!

| नवी दिल्ली | आधार कार्ड नाही म्हणून कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यास नकार देता येणार नाही, असे निर्देश देत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय)ने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. लस देणे, उपचार करणे अथवा रुग्णालयात भरती करण्यासाठी आधार कार्ड नाही म्हणून त्याला नकार देणे योग्य नाही. केवळ आधार कार्डाचे कारण सांगून असे करू शकत नाही असेही सांगितले आहे.

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी आधार कार्ड नसेल तर उपचार करणे, हॉस्पिटलमध्ये भरती करणे आणि लसीकरण करण्यास नकार दिला जात आहे.

नागरिकांचा १२ अंकी आधार नंबर नसेल त्यांनाही लसीकरणासही अन्य सुविधा दिल्या पाहिजेत. जर कुठल्या नागरिकाकडे आधार कार्ड नसेल तर या सुविधा नाकारता येणार नाहीत, असे यूआयडीएने स्पष्ट केले आहे.

देशात सध्या ज्यांच्याकडे आधार कार्ड असेल त्यांनाच लसीकरण केले जात आहे. आधार कार्ड नसेल तर लसीकरण, आरोग्य सुविधा नाकारल्याने त्याबाबत तक्रारी होत्या. या तक्रारींनंतर हा निर्णय घेतला आहे. लसीकरणावेळी आधार कार्डचा १२ अंकी क्रमांक नोंदवून घेतला जातो. तसेच मोबाइल क्रमांक नोंदवला जातो. मात्र, ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढले नाही त्यांना कशी लस देणार याबाबत संभ्रम होता. परिणामी लसीकरणासह अन्य कारणांसाठी आधार कार्डमुळे होणारी अडवणूक थांबण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *