लिव्ह टू गिव फौंडेशन , डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करमाळा तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी 5 ऑक्सीजन मशीन…

| करमाळा | करमाळा तालुक्यासाठी अजून एक अत्याधुनिक सर्व सोयींनी युक्त रूग्णवाहिका तसेच करमाळा तालुक्यासाठी एक रक्तपेढी उभा करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असून लवकरच या सेवा तालुक्यात उपलब्ध होतील असा विश्वास शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी व्यक्त केला.

ठाणे जिल्हा पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथील लिव्ह टू गिव फौंडेशन , डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करमाळा तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी 5 ऑक्सीजन मशीन आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते करमाळा तालुका पत्रकार संघास प्रदान करण्यात आली. आज पहिल्या टप्प्यात यातील 3 मशीन सुपूर्द करण्यात आल्या असून पुढील महिन्यात उर्वरित 2 मशीन देण्यात येणार आहेत. तसेच आवश्यकता असल्यास आणखी 10 ऑक्सिजन मशीन देण्यात येणार असल्याचे मंगेश चिवटे यांनी सांगितले. या सर्व ऑक्सिजन मशीनची कॅपसिटी 7 ते 9 लिटर असून अतिशय चांगल्या दर्जाच्या आहेत.

यावेळी मंगेश चिवटे यांनी लिव्ह टू गिव फौंडेशनचे सर्वेसर्वा श्री मर्जी पारेख , डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनचे सर्वेसर्वा खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे आभार मानले. तसेच ठाणे जिल्हा पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या काळात आणखी वैद्यकीय सेवा करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री महेश चिवटे, सचिव श्री नासिर कबीर, वरिष्ठ पत्रकार श्री अशोक नरसाळे यांच्यासाहित पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

ठाणे जिल्हा पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथील लिव्ह टू गिव फौंडेशन , डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करमाळा तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी 5 ऑक्सीजन मशीन आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते करमाळा तालुका पत्रकार संघास प्रदान करण्यात आली. आज पहिल्या टप्प्यात यातील 3 मशीन सुपूर्द करण्यात आल्या असून पुढील महिन्यात उर्वरित 2 मशीन देण्यात येणार आहेत. तसेच आवश्यकता असल्यास आणखी 10 ऑक्सिजन मशीन देण्यात येणार असल्याचे मंगेश चिवटे यांनी सांगितले. या सर्व ऑक्सिजन मशीनची कॅपसिटी 7 ते 9 लिटर असून अतिशय चांगल्या दर्जाच्या आहेत.

यावेळी मंगेश चिवटे यांनी लिव्ह टू गिव फौंडेशनचे सर्वेसर्वा श्री मर्जी पारेख , डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनचे सर्वेसर्वा खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे आभार मानले. तसेच ठाणे जिल्हा पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या काळात आणखी वैद्यकीय सेवा करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री महेश चिवटे, सचिव श्री नासिर कबीर, वरिष्ठ पत्रकार श्री अशोक नरसाळे यांच्यासाहित पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी करमाळा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर संदेश शहा डॉक्टर शेलार व बाल रोग तज्ञ डॉक्टर गायकवाड उपस्थित होते यांच्या रुग्णालयात या मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *