| मुंबई | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदीचे तर काही जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा आदेश दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तेव्हा शाळा चालू करण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोक वर काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांबाबत मोठी घोषणा केली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार 1 मार्च 2021 पासून आवश्यकता भासल्यास आणि परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे आदेश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या. तर ज्या शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे तिथे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्यासंबंधी स्थानिक प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. काही शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समाजकल्यामंत्री, आदिवासी विकास मंत्री यांच्यासोबत चर्चा करण्यात येत असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत जनतेला 1 आठवड्याचा अल्टिमेट दिला आहे. कोविडयोद्धा होता नाही आलं तर कोविड दूत तरी होऊ नका, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी नागरिकांना केलं आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .