लोक आरोग्य : गवती चहा पिणे आरोग्यास उपयुक्त, वाचा काय आहेत फायदे..

सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण झालयं. त्यात मग गरमागरम चहाची सोबत! तो पण गवती चहा. बऱ्याच जणांच्या घरातील कुंडीत गवती चहा लावला जातो. गवती चहाला एक प्रकारचा सुंगध असतो. गवती चहा प्यायल्याने फ्रेश वाटतं किंवा दिवसभरात कामाचा कंटाळा आला असल्यास गवती चहा रिफ्रेश करतो.

१. गवती चहा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. फंगल इनफेक्‍शन टाळण्यासाठी गवती चहा प्यावा.
२. सांधे दुखी, गुडघेदुखीचा त्रास होत असल्यास गवती चहाचे तेल लावल्याने आराम मिळतो.
३. गवती चहा “डिटॉक्‍स टी” म्हणून वापरला जातो. गवती चहा शरीरातील टॉक्‍सिन्स बाहेर काढण्यास मदत करते.
४. गवती चहामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे बल्ड प्रेशर कमी करण्यास मदत करते.
५. गवती चहा प्यायल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत करते.
६. गवती चहा व्हिटॅमिन “ए’ आणि व्हिटॅमिन “सी’ चा चांगला स्त्रोत आहे. ज्याने जी त्वचेला तेलकटपणा पासून दूर करते.
७. गवती चहाचा “डाययुरेटिक’ म्हणून वापर केला जातो.
८. गवती चहामध्ये व्हिटॅमिन “ए’, “बी’, ‘सी’, फोलेट, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, कॉपर, आयरन असते.
९. मासिक पाळीत येणाऱ्या क्रॅम्प पासून आराम मिळवण्यासाठी गवती चहा घेऊ शकता.
१०. कामाची दगदग धावपळ, डोकेदुखी, अंगदुखी जाणवत असल्यास गवती चहा प्यावा.
११. ताप येत असल्यास गवती चहा, दालचिनीचा काढा घ्यावा, ताप झटक्‍यात कमी होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *