म्हणून या लोकप्रतिनिधींच्या हाती लोकशाही सुरक्षित आहे…!

वर्षातील मावळत्या सूर्याच्या साक्षीने रक्तदान करून ठाणेकर गेली २७-२८ वर्ष नववर्षाचे स्वागत करत आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा यज्ञ त्यांचे वारसदार आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. ठाणे जिल्हा शिवसेना व रक्तानंद ग्रुप यांच्या मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. तसेच अनेकवेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना रक्तकर्ण पुरस्कार दिला जातो. यंदा विशेष म्हणजे ३६ वेळा रक्तदान करणाऱ्या बदलापूर येथील महिला रक्तदात्या अर्चना सुराडकर यांना रक्तकर्ण या पुरस्काराने गौरवण्यात आले, हे विशेष…! तसेच यंदा अजून एक पथदर्शी गोष्ट इथे या शिबिरात घडली, ती म्हणजे तरुण, कार्यतत्पर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या रक्तदानाची…!

३१ डिसेंबरला रात्री १२ च्या ठोक्याला दरवर्षी रक्तदान करून ठाणेकर नववर्षाचे स्वागत करतात. या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रक्तदान करून इतरांना प्रोत्साहन दिले.

मतदारसंघासाठी लोकोपयोगी उपक्रम, कार्यक्रम सातत्याने राबवित असताना रचनात्मक आणि विकासात्मक दर्जा उंचावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्न करत असतात. देशातील संसदीय कामकाजात देखील अव्वल ५ खासदारांमध्ये सातत्याने आपला नंबर राखत त्या आघाडीवर देखील खासदार डॉ. शिंदे आपले कार्य चोखपणे पार पाडत आहेत.

दांडगा जनसंपर्क, मतदारसंघासाठी सहज उपलब्धता, संसदीय कामकाजात अव्वल सहभाग, मतदारसंघाचा विकासात्मक दर्जा उंच राखण्यासाठी विविधांगी योजना कार्यान्वित करणे, कला – क्रिडेसाठी विविध उपक्रम घेणे आदी बाबतीत खासदार डॉ श्रीकांत शिंदे सातत्याने इतर लोकप्रतिनिधी यांना पथदर्शी ठरत आहेत. त्यात नवीन वर्षाच्या निमित्ताने रक्तदान करून त्यांनी अजून एक उत्तम उदाहरण उभे केले आहे.

त्यामुळे एक नक्की; अश्या लोकप्रतिनिधींच्या हाती आपली लोकशाही सुरक्षित आहे, हे म्हणणे वावगे ठरणार नाही..!

– सारंग कुलकर्णी, ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *