
| कल्याण | राज्यातील पोलीस व नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी तसेच पोलिसांच्या कुटुंबाला साथ देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. संतोष कृष्णा चौधरी उर्फ (दादूस) यांनी महाराष्ट्र पोलीस फॅमीली संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा विधीशा ईशा यांच्या निवास्थांनी सदिच्छा भेट दिली असता यावेळी संतोष चौधरी यांनी त्यांच्या जीवनातील घडलेल्या समाजिक व संस्कृतीक विषयवर विधिशाताई यांच्याशी चर्चा केली
सुप्रसिद्ध समाजसेवक व संगीतकार संतोष चौधरी उर्फ (दादूस) हे सुरुवातीला देवीच्या जागरणाचे कार्यक्रम करायचे तिथूनच त्यांना प्रसिद्धी व प्रेरणा मिळत गेली.त्यानंतर त्यांनी अगदी छोट्या पडद्यावर अभिनय व गीत गाऊन स्वत:ची ओळख निर्माण केली यामुळे ते मुंबई सारख्या शहरात ते प्रसिद्ध झाले. या कालखंडात त्यांच्यासोबत अनेक लोक व कलाकार जोडले गेले. ठाणे – मुंबई येथील कलाकारांना एकत्रित करुन राज्य व परराज्यातील मोठ मोठ्या शहरात कार्यक्रम करू लागले यामुळे दादूस हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले. त्यांची गाणी व्हिडियो अलबमच्या माध्यमातून लोकांना खूप आवडू लागली.
त्यांच्या यशात त्यांचे गुरुवर्य म्हणुन कै.अनंत पांचाळ यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याच मार्गदर्शनातून अनेक अल्बम त्यांनी प्रकाशीत केले. गीत व संगीतकार बप्पी लहेरी यांच्या जीवनावरील आधारीत संतोष चौधरी यांनी शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली. दादूस यांना जिवनातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपट अभिनेता शाहरुख खान यांच्या प्रोडक्शन मार्फत सुरु असलेल्या हिंदी सिरियल मध्ये त्यांना विशेष कलाकार म्हणून संधी मिळाली होती
संतोष चौधरी यांनी त्यांच्या जीवनातील अनेक किसे त्यांनी महाराष्ट्र पोलीस फॅमीली संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा सौ. विधिशाताई ईशा यांच्या समोर व्यक्त केले. संस्कृतीक व समाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे संतोष चौधरी उर्फ दादूस यांचा विधीशा ईशा यांनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .
।। जय जिजाऊ ।।