महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ शाखा – भुसावळ कार्यकारीणी आणि जिल्हा सदस्य निवड

| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ शाखा – भुसावळ तालुका नूतन कार्यकारणीची आणि नूतन जिल्हा सदस्यांची निवड दिनांक 12 मार्च 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता सु. ना. फालक विद्यालय, भुसावळ येथील सर्वसाधारण सहविचार सभेत अत्यंत खेळी-मेळीच्या वातावरणात लोकशाही पद्धतीने करण्यात आली.

                सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. प्रसन्ना प्रभाकर बोरोले मा. अध्यक्ष तथा विद्यमान संचालक खाजगी प्राथमिक शिक्षक पतपेढी जळगाव, निरीक्षक म्हणून श्री. आय. जी. माळी सर माजी जिल्हाध्यक्ष, प्रमुख पाहुणे श्री. हेमंतकुमार पाटील जिल्हाध्यक्ष, श्री. हेमंत धांडे जिल्हा उपाध्यक्ष, श्री. संतोष मराठे जिल्हा सदस्य, श्री. दीपक टोके जिल्हा सदस्य, श्री रवींद्र पाटील उपाध्यक्ष खा. प्रा. शि. पतपेढी जळगाव, श्री वना महाजन तालुकाध्यक्ष पारोळा, श्री. हरीष कोल्हे मुख्याध्यापक सु. ना. फालक विद्यालय, भुसावळ हे होते.
                 

                  नूतन कार्यकारिणीत गणेश लोखंडे अध्यक्ष, नरेश मुऱ्हेकर उपाध्यक्ष, सुनिता बऱ्हाटे उपाध्यक्ष, भूषण झोपे सचिव, समीर तडवी सहसचिव, पंडित जंगले सहसचिव, पंकज सूर्यवंशी कोषाध्यक्ष, अनिल सरोदे हिशोबनिस, चेतन शर्मा प्रसिद्धी प्रमुख, तर सदस्य म्हणून दीपक नारखेडे, हितेश सरोदे, संदीप निळे, नवाब तडवी, आसिफ बेग, तुषार भोळे, सुनील जाधव, रामकृष्ण इतवारे, देव सरकटे, पद्माकर सोनवणे या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा कार्यकारिणीसाठी तालुक्यातून महिला सदस्य हेमांगीनी चौधरी यांची बिनविरोध तर जिल्ह्यासाठी इच्छुक 5 उमेदवारांपैकी जीवन महाजन आणि विजय झोपे यांची लोकशाहीतील मतदान पद्धतीने निवड करण्यात आली.

                    दिलेल्या निर्देशानुसार अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. – निरीक्षक तसेच माजी जिल्हाध्यक्ष आय जी माळी सर

                     पूर्वीच्या कार्यकारीणीने उत्तम कामगिरी केली आणि कार्यकारीणी निवडीचा भुसावळ तालुक्याने संपूर्ण जिल्ह्यासाठी एक नवीन आदर्श प्रस्थापित केला – श्री हेमंतकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष जळगाव

                      सभेचे अध्यक्ष श्री प्रसन्ना बोरोले तालुक्यातील एकजुटीचे कौतुक आणि या निवड प्रक्रियेत सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार तसेच नवीन कार्यकारिणीतील नव्या दमाच्या युवा कार्यकर्त्यांचे अभिनंदन – श्री. प्रसन्ना प्रभाकर बोरोले,सभेचे अध्यक्ष तसेच मा. अध्यक्ष आणि विद्यमान संचालक खाजगी प्राथमिक शिक्षक पतपेढी जळगाव.

                        सभेचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी केले तर आभार गणेश लोखंडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *