| मुंबई | महाराष्ट्र जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेची बैठक रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली.
यावेळी महाराष्ट्र जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार सविस्तर चर्चा करून पंचायत समिती स्तरावरील सहाय्यक लेखा अधिकारी यांच्याकडे सोपवलेल्या अतिरिक्त कामा बाबत सहमतीने निर्णय घेणे साठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस शासनाच्यावतीने अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार (रोहयो) तसेच सचिव, उपसचिव व कक्ष अधिकारी यासोबतच मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अशोक शिरसे, एस. आर. मालपाणी हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या चर्चेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, स्वच्छ भारत मिशन, राजीव गांधी गतिमान प्रशासन योजना व महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनांची अतिरिक्त कामे या अतिरिक्त कामामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर असे निवेदन सादर करण्यात आले होते.
या दरम्यान अतिरिक्त मुख्य सचिव यांनी संघटनेच्या न्याय मागण्यावर चर्चा करताना काही धोरणात्मक बाबी विषद केल्या त्यावर संघटनेच्या वतीने गमे पाटील व संजय महाळंकर यांनी तीव्र विरोध करून कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय या बैठकीत व्हावे असा आग्रह धरला होता. एकंदरीत बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे यावेळी मंत्र्यांनी मान्य केले असल्याचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी सांगितले आहे.
त्यानुसार संघटनेने मांडलेले मुद्दे, चर्चेअंती सर्व संमतीने मान्य करण्यात आले.
१. एमआरईजीएस च्या अतिरिक्त कामाबाबत सहाय्यक लेखा अधिकारी यांना विशेष वेतन देण्यात येईल.
२. पंचायत समिती स्तरावर एमआरईजीएसचे लेखा विषयक काम करण्याकरिता सहाय्यक लेखा अधिकारी व दोन सहाय्यक कर्मचारी देण्यात येईल.
३. मग्रारोहयो अंतर्गत पंचायत समिती स्तरावर सलेअ यांच्या वर केलेल्या प्रशासकीय कारवायास स्थगिती देण्यात येईल.
४. मग्रारोहयो अंतर्गत काम करत असताना केलेल्या कारवाईमुळे सहाय्यक लेखा अधिकारी यांना निवृत्ती वेतना पासून वंचित ठेवण्यात येऊ नये.
5. सहाय्यक लेखा अधिकारी यांना वर्ग-2 चा दर्जा मिळण्यासाठी रोहयो खात्यामार्फत प्रस्ताव सादर व्हावा.
या बैठकीस महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचन्द्र चिलबुले यांच्या वैद्यकीय कारणांमुळे अनुउपस्थित असल्याने त्यांच्या विनंतीनुसार एकजुटीच्या चळवळीत अग्रणीय नेते महाराष्ट्राची बुलंद तोफ अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे कार्यकारिणी सदस्य तथा राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे सचिव अविनाश दौड, मुंबई यांनी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या अभ्यासपूर्ण मांडल्या. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष एन.एन. ठाकूर बैठकीस उपस्थिती होते. यावेळी संघटनेचे सचिव संजय महाळंकर यांनी मंत्री यांचे व सर्व सन्माननीय उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .