माजी शिक्षक आमदार कै. रामनाथ मोते यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे आज ठाण्यात उद्धाघाटन..!

| मुंबई | कोकण मतदार संघातून तब्बल दोन वेळा शिक्षक आमदार म्हणून राहिलेले दिवंगत व माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचा २३ ऑगस्ट रोजी पहिला स्मृतीदिन असून यासाठी आपल्या लाडक्या नेत्याचे स्मरण करण्यासाठी त्यांच्या अर्धाकृती पुतळा ठाण्यातील शिक्षकांच्या विद्यासेवक पतपेढीत उद्घाटन केले जाणार आहे.

यासोबत कोकणातील शिक्षकांकडून रत्नागिरीतही मोते यांच्या आठवणी आणि वारसा कायम राहावा म्हणून तिथेही एक शिल्प उभे केले जाणार आहे.

शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांच्या प्रश्नासाठी आयुष्य वेचलेल्या मोते यांची आठवण कायम राहावी म्हणून ठाण्यातील विद्यासेवक पतपेढीच्या मुख्य सभागृहात त्यांचा अर्धकृती पुतळा उभा केला जाणार असल्याची माहिती शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी दिली.मोते यांनी सन १९७५- १९७६ पासून मोते सरांनी अध्यापन कार्याबरोबरच संघटनेच्या कामालाही सुरूवात केली होती. शिक्षकांना सेवा संरक्षण देणारा अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ लागू करण्याकरीता राज्यभर जी विविध स्वरूपांची आंदोलने झाली त्यामध्ये अगदी नव्याने कामाला सुरूवात करणाऱ्या मोते सरांचा सक्रीय सहभाग राहिला होता.

कोकण विभागाचे शिक्षक आमदार म्हणून त्यांनी विधानमंडळामध्ये १२ वर्षे उल्लेखनीय कामकाज केले होते. विधीमंडळात शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडल्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त २००६-२००७ साली उत्कृष्ट भाषण पुरस्काराने राष्ट्रपतींच्याहस्ते सन्मानही करण्यात आला होता. त्यांनी सभागृहात शिक्षकांच्या प्रश्नासोबत रस्त्यावरही उतरून अनेक आंदोलने करत शिक्षकांना न्या मिळवून दिला होता, त्यांच्या आठवणी कायम राहव्यात, त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही ठाणे आणि रत्नागिरी येथे त्यांचा अर्धाकृती पुतळा त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने बसवत असल्याचे घागस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *