माणसातला देव माणूस : पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमुळे वाचले अनेकांचे प्राण..!

दिनांक ११ एप्रिल ची रात्र….एक भयानक रात्र. कल्याण मधील चार प्रसिध्द रूग्णालयात ऑक्सिजन संपायला आला तरी दररोज येणारा ऑक्सिजन पुरवठा झाला नाही. गॅस वितरक एजन्सीकडून ऑक्सिजन तुटवडा असल्यामुळे यापुढे ऑक्सिजन सप्लाय करतात येणार नाही असे पत्र देण्यात आले..

ऑक्सिजन लावलेले ५०० कोरोना रूग्ण ऑक्सिजन न मिळाल्यास मृत्युमुखी पडण्याची शक्यता होती. फार मोठा प्रश्न निर्माण झाला.

डॉक्टरांनी रात्री १ वाजता पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांकडे संपर्क केला व बिकट प्रसंग सांगितला. तात्काळ शिंदे साहेब यांनी रात्रभर जागून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या मदतीने पहाटे पाच वाजता ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करून दिला. त्यामुळेच ऑक्सिजन वर असणारे चार रुग्णालयातील पाचशे कोरोनारूग्णांचे प्राण वाचले.
सर्व डॉक्टरांनी मेसेज पाठवून व फोन करून शिंदेसाहेबांचे आभार मानले. (येथे मुद्दाम डॉक्टर व रूग्णालयाचे नाव जाहीर केले नाही)

अडचणीच्या वेळी मग रात्र असु, दे की दिवस शिंदेसाहेब मदतीला धावून येतात त्यामुळेच ते सर्वांसाठी एक फार मोठे आधार आहेत..

– श्री. देशमुख, कल्याण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *