मराठी सोयरीक घेणार सर्व जातीय ऑनलाईन मेळावा, मा. नवनाथ जी धुमाळ यांचे प्रतिपादन..

| अहमदनगर | मराठी सोयरीक संस्थे मार्फत ऑनलाईन पहिला सर्व जातीय वधुवर मेळावा येत्या 31 जानेवारी 2021 रोजी घेणार असल्याची घोषना लाईफलाईन उद्योग समुहाचे अध्यक्ष नवनाथजी धुमाळ साहेब यांनी केली.

हॉटेल यश पॅलेस या ठिकाणी नुकताच जनहित फाऊंडेशन चा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला . या वेळी अध्यक्ष स्थानी माजी कुलगुरू मा. सर्जेराव निमसे सर, लॉ कॉलेज प्राचार्य एम.एम. तांबे सर, लाईफ लाईन उद्योग समुहाचे अध्यक्ष नवनाथ धुमाळ, नगरसेवक अविनाश घुले, पोलिस निरिक्षक नितीन रणदिवे इतर मान्यवरांच्या उपस्थ‍ितीत घोषणा करण्यात आली.

मराठी सोयरीक संस्था ही एक नामाकिंत संस्था असुन आत्तापर्यंत मराठा समाजाचे 55 यशस्वी वधुवर मेळावे घेतले आहेत. त्यापैकी 5 मेळावे ऑनलाईन झालेले आहेत. नुकताच धुमाळ साहेबांच्या हस्ते पहिल्या सर्व जातीय मेळाव्याची घोषणा करण्यात आली आहे. या मेळाव्यामुळे सर्व जाती धर्माच्या वधुवरांना व पालकांना समोरासमोर स्थळ पाहण्याची संधी मिळणार आहे. या मध्ये वधुवरांनी एक फोटो व बायोडाटा संस्थेकडे पाठवुन नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. हा मेळावा रविवारी दुपारी 2 वा .गुगल मीट ॲप वर होणार आहे.

आज पर्यंत या संस्थे मार्फत 2000 लग्न जमलेत व 300 लग्न हे विधवा, घटस्फोटीत, विधुर यांचे जमले आहेत. या संस्थेमार्फत व्हॉट्स ॲप, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, टेलिग्राम व मोबाईल ॲप यांचा जास्त प्रमाणात वापर करून वधुवरांना व पालकांना घरबसल्या अनेक स्थळे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या संस्थेला सर्व जातीधर्मांची मागणी वाढली आहे. नावनोंदणी साठी संपर्क नं. 7020281282 या वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्या व सोयरीक ग्रुपच्या संचालिका सौ जयश्री अशोक कुटे, जनहित फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव कदम, मा. बाबासाहेब वायकर, सोयरीक ग्रुपचे सक्रिय सदस्य मा. प्रमोद झावरे, संचालिका अंजली पठारे मॅडम, मा. धनराज गुंड साहेब, योगेश कोतकर, आशिष शिंदे, नकुल कुटे, अर्जन झरेकर, उदय शिरसाठ यांनी असे आवाहन केले आहे. जास्तीत जास्त पालकांनी व वधुवरांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *