माऊली फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन…!

| भडगाव | माऊली फाऊंडेशन, भडगाव यांच्या मार्फत अनेक सामाजिक कार्य केले जातात. त्यांत योग-शिबिर, नाला खोलीकरण, वृक्षारोपण, अभ्यासिका, पाणपोई, कोरोना काळात गरजु लोकांना किराणा, मास्क, सँनेटाईझर व आर्सेनिक अल्बब गोळ्या वाटप, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृती, गरजु मजुरांना व्यवसायासाठी हातगाडी वाटप आदी सामाजिक कार्य केले जाते. त्यांत एक महत्वपुर्ण कार्य म्हणजे दरवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते.

यंदा शिवजयंतीचे औचित्य साधुन 19 फेब्रुवारी 2021 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले. सदर रक्तदान शिबिर निदान हाँस्पिटल, भवानी बागेसमोर भडगाव येथे सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहणार असुन जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन माऊली फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.

याबाबतीत अधिक माहिती देतांना माऊली फाऊंडेशनचे स्वंयसेवक तथा गोंडगाव येथील आरोग्यसेवक संजय सोनार कळवाडीकर यांनी सांगितले की रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्ताची गरज राजापासुन रंकाला असते. सीमेवर लढणार्या जवानांना, अपघातातील व्यक्तिंना, गरोदर मातांना रक्ताची गरज भासते. मी आरोग्य सेवेत कार्य करीत असल्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या अनेक गरोदर मातांना रक्त कमी असते. अशा माता व त्यांचे जन्माला येणारे बाळ दोघांनाही रक्ताच्या कमतरतेमुळे धोका असतो. गरोदर मातेस आपण रक्तदान केल्यास दोन जीवांचे प्राण आपण वाचवु शकतो, म्हणुन रक्तदान करणे किती महत्वपुर्ण आहे. हे आपण समाजात पटवुन त्यासंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *