
| मुंबई | आपल्या हक्काचं घऱ विकत घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने खूशखबर दिली आहे. लवकरच ठाणे, कल्याण परिसरात ७५०० घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ठाण्यात भंडारली आणि गोटेघर येथे तर कल्याणमध्ये शिरडोन खोणी येथील म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. मार्चमध्ये लॉटरीची प्रक्रिया आणि सोडत मे महिन्यात जाहीर होऊ शकते.
विरारमध्ये पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या घरांची लॉटरी आज काढण्यात आली. ज्या पोलिसांना घर हवं आहे त्यांनी कोकण म्हाडाशी संपर्क साधावा असं आवाहन आव्हाड यांनी यावेळी केलं. पोलीस, चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना घरं उपलब्ध करून देणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
मुंबईची लॉटरी उद्या जाहीर होणाऱ
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी म्हाडाची मुंबईची लॉटरी गुरुवारी जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. मुंबईमधील ना. म. जोशी मार्गावरील ३०० घरांची लॉटरी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास जाहीर होईल असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..