मध्य रेल्वेचे पाऊल पुढे, ट्रेनमधून बसल्या जागी बुक करता येणार बसचे तिकीट…!

| मुंबई | लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांमधून उतरणाऱया प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थानांवर जाण्यासाठी बस आणि टॅक्सीच्या रांगेत ताटकळावे लागते. त्यामुळे प्रवाशांना आता ट्रेनमधून बसल्या जागी अॅपवर आपले आसन आरक्षित करता येणारी नवीन अॅप आधारित बससेवा सुरू होणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि एलटीटी स्थानकातून या बस सेवेला प्रारंभ होणार आहे. मध्य रेल्वे आपल्याकडील मोकळी जागा या बससेवेसाठी खासगी कंपन्यांना भाडय़ाने उपलब्ध करून देणार आहे.

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकातून कालच ई-बाईक बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथील लांबपल्ल्याच्या प्रवाशांना मुंबई शहरातील आणि उपनगरातील आपल्या घर आणि कार्यालयात जाण्यासाठी या अॅप आधारित बस सेवेचा उपयोग होणार आहे.

सीएसएमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 18 च्या बाजूला आणि एलटीटी स्थानकाबाहेरही मोकळ्या जागेत या बसेस पार्क केल्या जाणार आहेत. एक बस पार्क करण्याएवढी जागा दिली जाणार आहे. या बदल्यात वार्षिक तीन लाख रुपये बेस फेअर कंपनीकडून आकारण्यात येणार आहे. यासाठी पुढच्या महिन्यात टेंडर खुले होणार असल्याचे सूत्रांनी सांगितल

या स्थानकांतून खासगी वाहतूक सेवा :

कुर्ला स्थानकात ई-बाईक सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. ठाणे स्थानक हद्दीत खासगी कंपन्यांना ई-रिक्षा सेवेसाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. आता सीएसएमटी, भायखळा, परळ, दादर, मुलुंड, भांडुप स्थानक हद्दीतही प्रवाशांसाठी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची वाहतूक सेवा देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *