लाखो तरुण कर्मचारी मुख्यमंत्र्यांना देणार आर्त साद, जुनी पेन्शन आणि फॅमिली पेन्शन साठी ट्विटर उद्या होणार आंदोलन..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना ही लाखो तरुण कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबास फॅमिली पेन्शन मिळावी यासाठी वेळोवेळी लढणारी म्हणून ओळखली जाणारी संघटना आणि याच मागणीसाठी लाखो कर्मचाऱ्यांनी आजतागायत अनेक आंदोलने केली.

सर्वच तरुण कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याकारणाने प्रत्येक आंदोलनात लाखोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी होतात. परंतु यावेळी कोरोना काळ व प्रतिबंध असल्याने ज्या प्रकारे शासनाने, सरकारने आपल्या परीने प्रत्येक बाब, सूचना जनतेपर्यंत, कर्मचापर्यंत सोशल मीडिया च्या माध्यमातून पोचवली अगदी तसेच कोरोना चे सर्व नियम पाळून कर्मचारी देखील आपली व्यथा सोशल मीडिया म्हणजेच ट्विटर च्या माध्यमातून मांडणार आहेत आणि तेही ऐन अधिवेशन दरम्यान दिनांक 5 जुलै 2021 रोजी ट्वीटर आंदोलन तसेच 6 जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तथा सर्व मंत्री महोदयांना आपल्या मागणीबाबत ईमेल आंदोलन या वैशिष्ट्य पूर्ण आंदोलनामुळे व त्याच कालावधीमध्ये संघटनेचे राज्यपदाधिकारी मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयात धडकणार आहेत. त्यामुळे नक्कीच सरकार दरबारी तरुण कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास सर्व कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे.

खालील हॅशटॅग चा वापर करून लाखो कर्मचारी ट्विटर आंदोलन करणार आहेत…
#उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा
#Justice4MH_Dead_NPSEployees

सर्व तरुण कर्मचाऱ्यांना ही खात्री आहे की ज्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांनी या कोरोना काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वतःला झोकून कोरोना विरोधात लढाई केली आणि त्यादरम्यान, अनेकांना आपले प्राण देखील अर्पण करावे लागले त्यांना, त्यांच्या कुटूंबाला तसेच सर्वच कर्मचाऱ्यांना शासन, प्रशासन व स्वतः मुख्यमंत्री व सर्व मंत्रीगण नक्कीच योग्य तो न्याय देतील व सदर मागणी सकारात्मक प्रतिसाद देऊन सोडवतील, असा ठाम विश्वास महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे सर्व राज्यपदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व सर्व राज्यभरातील तालुका पदाधिकारी तसेच सर्वसामान्य शिलेदार याना वाटतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *