| सोलापूर | अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी परिभाषित पेन्शन योजना व रिक्त जागांसाठी भरती सुरू करा. कंत्राटी आणि बदली कामगारांना सेवेत कायम करा, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष द्या, अन्यथा तीव्र लढा उभारू असा इशारा अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते अविनाश दौंड यांनी दिला.
लिंबी-चिंचोळी येथे आयोजित विभागीय कर्मचारी मेळाव्यात ते बोलत होते. कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच आर्थिक गळचेपी केली जात आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी मध्यवर्ती संघटनेला चर्चेला बोलवावे, असेही दौंड यांनी म्हणाले. बृहन्मुंबई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी आरोग्य सेवेतील रिक्त पदे तातडीने भरा. जनतेला आरोग्य सेवा विनामूल्य पुरवा, अशी मागणी केली. जिल्हा सरचिटणीस अमृत कोकाटे यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्याला मारुती शिंदे (पुणे), पी. एन. काळे (सांगली) यांनी मार्गदर्शन केले. मुंबई जिल्हा कोषाध्यक्ष गणेश बकशेट्टी, नेताजी दिसले, सुनील बागुल आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय खात्यातील उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विरुपाक्ष घेरडे यांनी आभार मानले.
” अंशदायी पेन्शन योजना रद्द होण्यासाठी शेतकऱ्यांप्रमाणे देशभरात मोठे आंदोलन सुरू करणे आवश्यक आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सोलापूरप्रमाणे कर्मचारी मेळावा घेण्यात येणार आहे. “
– कोषाध्यक्ष गणेश देशमुख
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .