मोदींना एकही पत्र न देणाऱ्या, देवेंद्र फडणवीस यांचे सोनिया गांधी यांना पत्र..

| मुंबई | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. देशात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने काही मुद्दे उपस्थित केले होते. यामध्ये सोनिया गांधी यांनी काही लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली जावी असं मत व्यक्त केलं होतं. यावेळी त्यांनी करोनाविरोधातील लढाईत परिणामकारक निकालासाठी लसीला प्राधान्य देण्याच्या धोरणाची गरजही अधोरेखित केली होती.

तसेच काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर सोनिया गांधी यांनी हे पत्र पाठवलं होतं. बैठकीत त्यांनी राज्यातील परिस्थिती तसंच लसींची उपलब्धता, व्हेटिंलेटर आणि औषधांच्या सुविधेची माहिती घेतली होती.

बैठकीत पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडने आपल्याकडे लसींचा मर्यादित साठा असल्याचं सांगत केंद्राने तो पुरवठा वाढवावा अशी मागणी केली होती.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाकाळात मोदी सरकारकडून अधिक मदत मिळावी यासाठी मोदींकडे किमान पत्राद्वारे कोणताही पाठपुरावा न करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिण्यासाठी वेळ काढल्याचं पाहायला मिळतंय. त्यावरून फडणवीसांना राज्याला केंद्रातून अधिक मदत कशी मिळेल यापेक्षा राजकारण करण्यातच रस असल्याचं सिद्ध होतंय. गडकरींनी आपत्ती काळात राजकारण न करण्याचा सल्ला देऊन सुद्धा राज्यातील नेते बदलण्यास इच्छुक नसल्याचं पाहायला मिळतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *