| मुंबई | ठाकरे सरकारला अंधारात ठेवून मराठा आरक्षणविरोधी सर्वोच्च न्यायालयात एमपीएमससीमार्फत परस्पर याचिका दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आली आहे. प्रदीप कुमार यांना हटवून त्यांच्या जागी स्वाती म्हसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत सुनावणी सुरु असतानाच एमपीएससीने परस्पर याचिका दाखल केली होती. या प्रकरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीसह अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सरकारला अंधारात ठेवून MPSC ने परस्पर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांची निवड रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु आता एमपीएससीने वकिलांना ही याचिका मागे घेण्यास सांगितलं आहे.
9 सप्टेंबर 2019 रोजी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्याच्या आधीच्या मराठा आरक्षण लाभावर परिणाम होणार नाही असं सुप्रीम कोर्टानं तेव्हा म्हटलं होतं. पण एमपीएससीच्या काही जागाचे निकाल जाहीर होऊन नियुक्त्या देणे मात्र बाकी होतं. या नियुक्त्या कोरोनामुळे रखडल्याने काही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एकीकडे आमच्या नियुक्त यांना परवानगी द्यावी ही याचिका सुप्रीम कोर्टात या विद्यार्थ्याने दाखल केली आहे. त्यावेळी तुमच्या सोबत राहू असा विश्वास सरकारने दिला होता. मात्र त्याच वेळी एमपीएससीने दुसरी याचिका कोर्टात दाखल केली होती. ज्यात हा निकाल रिवाईज करण्याची परवानगी मागितली होती. त्यासाठी या निकालतला मराठा आरक्षण लाभ वगळण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाकडे एमपीएससीने मागितली होती.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .