| मुंबई | म्युकरमायकोसिस या आजाराचा गंभीर आजारांच्या यादीत तातडीने समावेश करावा अशी मागणी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना केली आहे.
सद्यस्थितीत राज्यात म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य गंभीर आजाराची लागण वाढिस लागली आहे. याबाबत शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणे बाबतच्या सुचना राज्य शासनाने दिल्या आहेत त्याबद्दल संघटनेने आभार व्यक्त केले आहेत. परंतु अजुनही करोना बाधितांचे उपचार मोठ्या संख्येने सुरू असल्याने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. या रुग्णांमध्ये शासकीय कर्मचारीही आहेत. खाजगी रुग्णालयातील सदर वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची प्रतिपुर्ती मिळण्यासाठी या आजाराचा गंभीर आजारांच्या यादीत समावेश करणे अत्यावश्यक आहे जेणेकरून शासकीय कर्मचाऱ्यांना उपचाराचा खर्च नियमानुसार प्राप्त होईल असे दौंड यांनी सांगितले आहे.
संघटना अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना विविध २७ गंभीर आजारांच्या उपचाराच्या खर्चाची परिपुर्ती अनुज्ञेय असुन शासनाने अलिकडेच करोनाचाही गंभीर आजारांच्या यादीत समावेश केला आहे. त्याचप्रमाणे म्युकरमायकोसिस हा गंभीर आजार असल्याने त्याचाही समावेश सदर यादीत करावा अशी मागणी केली आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .