मुंबई इंडियन्सने आपल्या दिग्गज गोलंदाजसह करारातून मुक्त केले हे ७ खेळाडू..!

| मुंबई | आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने IPL 2021 साठी संघबांधणीला सुरुवात केली आहे. विविध संघ आज अनेक खेळाडूंना संघातून मुक्त करत आहेत. तर आयपीएल लिलावात नव्या खेळाडूंवर नजर असेल. आज अनेक संघानी बड्या खेळाडूंना मुक्त केलं. एकट्या मुंबई इंडियन्सने तब्बल ७ खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामध्ये मुंबई इंडियन्समध्ये पहिल्या मोसमापासून असलेल्या लसिथ मलिंगाचाही समावेश आहे.

मुंबई इंडियन्सने दुबईत झालेल्या आयपीएल २०२० चं जेतेपद पटकावलं. मुंबई इंडियन्सच्या नावे आतापर्यंत पाच विजेतेपदं आहेत. नव्या मोसमात नव्या खेळाडूंसह उतरण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाली आहे.

मुंबई इंडियन्सकडून ७ खेळाडू रिलीज :

मुंबईने सात बड्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामध्ये लसिथ मलिंगा, न्यूझीलंडचा मिचेल मॅग्केघन, ऑस्ट्रेलियाचा नॅथन कल्टर नाईल, जेम्स पॅटिन्सन, शेर्फन रुदरफोर्ड, फिरकीपटू बलवंत राय आणि वेगवान गोलंदाज दिग्विजय देशमुख यांना मुंबई इंडिन्सने आपल्या संघातून मुक्त केलं आहे.

सध्या १८ जण ताफ्यात

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सध्या १८ खेळाडू आहेत. ज्या सात जागा रिक्त झाल्या आहेत, त्या येत्या आयपीएल लिलावात भरल्या जातील, असं मुंबई इंडियन्सने म्हटलं. मुंबई इंडियन्स चार परदेशी खेळाडूंना आपल्या ताफ्यात समावेश करण्याच्या तयारीत आहे.

मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेले खेळाडू :

फलंदाज:

रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (WK), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (WK), ख्रिस लीन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे (WK)

✓ अष्टपैलू खेळाडू :

किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय

गोलंदाज :

जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *