” मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय..?”

| मुंबई | महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून जुने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असतो. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर आता भाजपनेही मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सेनेचं नाक कापण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनाही प्रशासकीय डावपेच खेळून भारतीय जनता पक्षाची कोंडी करताना दिसत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता जेमतेम वर्षभराचा अवधी उरला आहे. अशावेळी नगरसेवकांकडून पाच वर्षातील बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपापल्या प्रभागात नवे प्रकल्प हाती घेतले जातात.

साहजिकच त्यासाठी निधीची गरज लागते. मात्र, शिवसेनेने निधीवाटपात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची चांगलीच कोंडी केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनीही विकास निधी वाटपावरून सवाल उपस्थित करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “६५० कोटी विकास निधीपैकी शिवसेनेच्या ९७ नगरसेवकांना २३० कोटी, भारतीय जनता पक्षाच्या ८३ नगरसेवकांना ६० कोटी, काँग्रेसच्या २९ नगरसेवकांना ८१ कोटी आणि हो स्थायी समिती अध्यक्षांना एकट्याला ३० कोटी. मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय? हा दुजाभाव मुंबईकरांसोबत करताय लक्षात असू द्या!,” अशा शब्दात शेलार यांनी शिवसेनेला सुनावलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *