
| मुंबई | शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीनं महाविकासघाडी सरकार स्थापन करण्याऱ्या काँग्रेसनं नाना पटोलेंसारख्या आक्रमक नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. नाना पटोलेंच्या साथीला 6 कार्यकारी अध्यक्ष आणि 10 उपाध्यक्षांची तगडी टीम असणार आहे. काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयानंतर काँग्रेस महाराष्ट्रात बळकट कशी होणार ते पाहावे लागणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये एकूण 37 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे.
नाना पटोलेंची तगडी टीम:
नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेस प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सांभाळताना या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरण्याची शक्यता आहे.
कार्यकारी अध्यक्ष कोण?
1. शिवाजी मोघे (यवतमाळ)
2. बस्वराज पाटील (उस्मानाबाद)
3. नसीम खान (मुंबई)
4. कुणाल पाटील (धुळे)
5. चंद्रकांत हंडोरे (मुंबई)
6. प्रणिती शिंदे (सोलापूर)
काँग्रेसचे 10 नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष कोण?
1. शिरीष चौधरी (जळगाव)
2. रमेश बागवे (पुणे)
3. हुसैन दलवाई (मुंबई)
4. मोहन जोशी (पुणे)
5. रणजीत कांबळे (वर्धा)
6. कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद)
7. बी. आय. नगराळे
8. शरद अहेर (नाशिक)
9. एम. एम. शेख (औरंगाबाद)
10. माणिकराव जगताप (रायगड)
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री