| नाशिक | नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडलं आहे. माजी आमदार वसंत गिते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल भाजपच्या या दोन मोठ्या नेत्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत गिते आणि बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वसंत गिते आणि सुनील बागुल आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं संजय राऊत यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
वसंत गिते आणि सुनील बागुल हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सध्या भाजपमध्ये होते. त्यामुळे आज शिवसेनेत प्रवेश करुन त्यांनी घरवापसी केली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच वसंत गिते यांनी सर्वपक्षीय समर्थकांना ‘मिसळ पार्टी’ देऊन शक्तिप्रदर्शन केले होते. तेव्हाच ते वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. दोन दिवसांपूर्वी गिते आणि बागुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. अखेर त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
वसंत गिते आणि सुनील बागुल भाजपमध्ये दुर्लक्षित झाले होते. मागील कार्यकारिणीत दोघांकडे प्रदेश उपाध्यक्षपद होते. परंतु, नव्या कार्यकारिणीत दोघांना पदावरुन हटवण्यात आलं. त्यांच्याऐवजी आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे दोघेही नाराज होते. त्यानंतर मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या दीर्घ चर्चेनंतर त्यांनी घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या हाती शिवबंधन बांधणार आहे.
नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडलं आहे. माजी आमदार वसंत गिते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल भाजपच्या या दोन मोठ्या नेत्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत गिते आणि बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वसंत गिते आणि सुनील बागुल आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं संजय राऊत यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
वसंत गिते आणि सुनील बागुल हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सध्या भाजपमध्ये होते. त्यामुळे आज शिवसेनेत प्रवेश करुन त्यांनी घरवापसी केली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच वसंत गिते यांनी सर्वपक्षीय समर्थकांना ‘मिसळ पार्टी’ देऊन शक्तिप्रदर्शन केले होते. तेव्हाच ते वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. दोन दिवसांपूर्वी गिते आणि बागुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. अखेर त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
वसंत गिते आणि सुनील बागुल भाजपमध्ये दुर्लक्षित झाले होते. मागील कार्यकारिणीत दोघांकडे प्रदेश उपाध्यक्षपद होते. परंतु, नव्या कार्यकारिणीत दोघांना पदावरुन हटवण्यात आलं. त्यांच्याऐवजी आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे दोघेही नाराज होते. त्यानंतर मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या दीर्घ चर्चेनंतर त्यांनी घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या हाती शिवबंधन बांधणार आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .