नैसर्गिक वायूंच्या किंमतीत वाढ, CNG इंधन महागणार..!

| नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारने देशातील सर्वसामान्यांना मोठा दणका दिला आहे.

मोदी सरकारने नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) किमतीमध्ये तब्बल 62 टक्क्यांनी वाढ (hikes) केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या वाढणार आहेत. नैसर्गिक वायूचा (Natural Gas) वापर खतं, वीज उत्पादन आणि सीएनजी (CNG) वायू तयार करणासाठी केला जातो. त्यामुळे सीएनजी, पीएनजी (PNG) आणि खतांच्या (fertilizers) किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

ओएनजीसी (ONGC) सारख्या सरकारी कंपन्या उत्पादन घेत असलेल्या नैसर्गिक वायूची (Natural Gas) किंमत 1 ऑक्टोबरपासून 2.90 डॉलर प्रति 10 लाख ब्रिटिश थर्मल युनिट (British Thermal Unit) एवढी असेल. यापूर्वी ही किंमत 1.79 डॉलर एवढी होती. परंतु आता नवा दर लागू होणार असून पुढील सहा महिन्यांसाठी हाच दर कायम असेल.

समुद्रातून काढण्यात येणाऱ्या वायूचा दर 6.13 डॉलर प्रति 10 लाख ब्रिटिश थर्मल युनिट इतका असेल. यासाठीचं नोटिफिकेशन (Notification) सरकारकडून जारी करण्यात आले आहे.

नैसर्गिक वायूच्या दरात भरभक्कम वाढ झाल्याने मुंबई (Mumbai), दिल्ली (Delhi) सारख्या मोठ्या शहरांमध्ये सीएनजी आणि पाईप गॅसच्या दरात 10 ते 11 टक्क्यांनी वाढ होईल.
अशी माहिती उद्योग जगतातील सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

वीज उत्पादनासाठी देखील नैसर्गिक वायूचा वापर होतो. परंतु याचा फारसा फटका ग्राहकांना बसणार नाही. नैसर्गिक वायूच्या मदतीनं तयार होणाऱ्या विजेचं प्रमाण कमी असल्याने ग्राहकांच्या खिशावर बोजा पडणार नाही. मात्र, खतांच्या उत्पादनासाठी येणारा खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम खतांच्या किमती वर होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *