नवी मुंबईत शिक्षक सन्मान सोहळा संपन्न..!

| मुंबई | सानपाडा शिक्षक मित्र परिवार व नवी मुंबई भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील सानपाडा येथील केमिस्ट भवन मध्ये शिक्षक सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व लोकनेते गणेशजी नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत श्री आहेर सर, रघुनाथ शिरोळे सर, आवारी सर , पानमंद सर , पवार सर , राऊत सर, पुणेकर सर, भामरे सर, कावळे सर, किसन पवार सर, शिंदे मॅडम, सरगर मॅडम ,वाफारे मॅडम यांच्यासह अशा 101 शिक्षक बंधू-भगिनींचा नुकताच प्रशस्तीपत्रकासह सन्मानचिन्ह देऊन जाहीर सन्मान करण्यात आला. यात विशेष प्रावीण्य प्राप्त शिक्षक व मूळत: शिक्षक असलेले नवनियुक्त मुख्याध्यापक व कालाध्यापक, प्रशासकीय अधिकारी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार, मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे नवनिर्वाचित प्रशासकीय अधिकारी किसन पावडे, महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उमाकांत राऊत, सुरेश डावरे पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील सर, समाजसेवक भाऊ भापकर, सुनीलदादा कुरकुटे, शैलताई पाटील, राजेश ठाकूर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेत यापुढील काळात शिक्षकांच्या हक्क संरक्षणासाठी व भविष्यासाठी नक्कीच धोरणात्मक निर्णय राबवले जातील असे मत नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रथम महापौर संजीव नाईक यांनी प्रतिपादन केला. कार्यक्रमाचे आयोजक भाऊसाहेब आहेर सर यांनी प्रस्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ सुरेखा आहेर मॅडम यांनी केले. समाजसेवक भाऊ भापकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *