नवजात शिशु देखभाल युनिट (एनआयसीयू) व बालरोग विभागाच्या स्थापनेसाठी १.२५ कोटी खासदार निधी, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार..

ठळक मुद्दे :
✓ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून उभारणार शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयात कायमस्वरूपी (एनआयसीयू) बालरोग विभाग
✓ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

| ठाणे | संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशासह राज्यातहि कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता तज्ञांनी दर्शविली आहे. याचा सर्वात मोठा परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचे समजते. याअनुषगाने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय, डोंबिवली येथे बालरोग तसेच (एनआयसीयू) तयार करण्याचा मानस कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने दर्शविला होता, खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदार निधीतून रुपये १.२५ कोटी इतका निधी महापालिकेस वर्ग करण्याचे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून सूचित केले आहे.

भविष्यात सदर परिस्थिती उद्भवल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता लहान मुलांसाठी हाय फ्लो यंत्रणा उभारण्यासाठी व ज्या मुलांना गहन वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते त्यांना समर्पित नवजात आईसीयू घटकांमध्ये ठेवले जाते. यापैकी प्रत्येक एनआयसीयू युनिट आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असते, प्रत्येक नवजात एकमेकापेक्षा वेगळा असतो आणि म्हणूनच, बाळांना एनआयसीयू काळजी घ्यावी लागेल किंवा याची काळजी घेण्यासाठी आरोग्य व्यावसायिकांनी त्यांची लक्षणे, शारीरिक आरोग्य इत्यादींचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. नवजात शिशु देखभाल युनिट (एनआयसीयू), ज्याला इन्टेन्सिव्ह केअर नर्सरी (आयसीएन) देखील म्हटले जाते, हे एक इंटेंसिव्ह केअर युनिट (आयसीयू) आहे जे आजारी किंवा अकाली नवजात अर्भकांची काळजी घेते. नवजात शिशु आयुष्याच्या पहिल्या २८ दिवसांचा उल्लेख करते. नवजात मुलाची काळजी, ज्यास विशेष नर्सरी किंवा गहन काळजी म्हणून ओळखले जाते.

ही बाब लक्षात घेता कल्याण लोकसभेचे खासदार यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली येथे अशा प्रकारचे सुसज्ज असे पेडिएट्रिक युनिट निर्माण करण्याची करण्याकरिता
१) ४० ते ५० खाटांचा बालरोग विभाग (Pediatric Ward) 
२) १० खाटांचा नवजात अतिदक्षता विभाग (Neonatal Intensive Care Unit-NICU)
३) १० खाटांचा बालरोग अतिदक्षता विभाग (PICU)
४) १० बालरोग वेंटिलेटर (Pediatric Ventilators)
५) बालरोग उपकरणे (Pediatric Equipment)
६) प्राणवायू वाहिन्या (Oxygen Lines)
अशा प्रकारचे सुसज्ज युनिट तयार करण्याचे निर्देश खासदार डॉ शिंदे यांनी महापालिकेस दिले.

सदर बालरोग विभाग व अतिदक्षता विभाग कोरोनाची साथ संपल्यानंतरही कार्यान्वित राहील, जेणेकरून कल्याण डोंबिवली महापालिकेस कायमस्वरुपी बालरोग विभाग असलेले रुग्णालय मिळेल आणि याचा फायदा जवळील शहरातील व खेड्यांमधील लहान बालकांना देखील होईल या अनुषंगाने यासाठी लागणारा १ कोटी २५ लक्ष इतका निधी हा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या खासदार निधीतून देण्याकरिता जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.

सदर बैठकीत ठाणे जिल्हाधकारी राजेश नार्वेकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कंडोमपा मा. महापौर विनिता राणे, नगरसेवक राजेश मोरे, विश्वनाथ राणे, व राजेश कदम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *