| बुलडाणा | शिवसेना आमदार संजय गायकवाड हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू सोडण्याची टीका केल्यानंतर राज्यात एकदम प्रकाशझोतात आले आहे. त्यातून शिवसेना आणि भाजप यांच्यात बुलढाण्यात रस्त्यावरील लढाई सुरू झाली आहे. राज्यातील इतर भाजप नेत्यांनी गायकवाड यांच्या टिकेचा समाचार घेतला. त्यानंतर आज पुन्हा गायकवाड यांनी आपल्या आरोपावर ठाम राहत देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत खळबळ उडवून दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला देखील संजय गायकवाड यांनी उत्तर दिले आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ज्यांना तुम्ही सोबत घेऊन फिरत असतात ते तळीराम आहेत त्यांच्यातला मी नाही. मी केलेल्या वक्तव्याची एकदा तुम्ही वेळ तपासून बघावी असा टोला देखील त्यांनी फडणवीसांना मारला आहे. आम्हाला सल्ले देण्यासाठी आमचे नेतृत्व खंबीर आहे. तुम्ही तुमचा सल्ला केंद्र सरकारला दिला तरी चालेल असे देखील ते यावेळी म्हटले आहेत. कारवाई नाही झाली तर मी न्यायालयाचा दरवाजा ठोठवणार आहे. तुमची पुढची चाल देखील मला माहित आहे. तुम्ही सीबीआय,ईडी माझ्या मागे लावू शकता परंतु मी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मला काहीही फरक पडणार नाही.
नितेश राणे यांच्यावर देखील त्यांनी बाण सोडले आहे. नितेश राणे हा बेडूक आहे. तो कोंबडी चोर देखील आहे. त्याला मी फोन देखील लावला होता. मात्र त्याचा फोन नाही लागला, नाहीतर त्याला मी जागेवरच सांगितले असते. परंतु त्याला मी ऊत्तर नक्कीच देणार आहे. मी मुख्यमंत्र्यांचा एक सहकारी आहे. मी त्यांच्या सहकाऱ्याच्या नात्याने यांना अंगावर घेतले आहे. नितेश राणे नेहमीच शेलक्या भाषेत टीका करत असतात. आज त्यांच्या भाषेत टीका केली तर त्यांचा तिळपापड होत आहे,अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .