| नोकरी Update | तरुणांसाठी सारस्वत बँकेत १५० जागांची भरती..! ही आहे सविस्तर माहिती..!

| मुंबई | महाराष्ट्रातील तरुणांना सारस्वत बँकेकडून नोकरीची सुवर्ण संधी. जर तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात क्लर्कची नोकरी शोधत असणाऱ्या तरुणांसाठी सारस्वत बँकेने संधी निर्माण केली आहे. बँकेने ज्युनिअर ऑफिसर – मार्केटिंग अँड ऑपरेशन्स या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

सारस्वत सहकारी बँकेच्या विविध राज्यांतील शाखांमध्ये ग्रेड बी (क्लेरिकल केडर) च्या एकूण १५० पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरातमधील बँकेच्या शाखांमध्ये ही भरती होणार आहे.

उमदेवार बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर saraswatbank.com उपलब्ध केलेल्या ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून हा अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन असून शुक्रवार ५ मार्च २०२१ पासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. उमेदवार १९ मार्चपर्यंतरच आपला ऑनलाइन ऍप्लिकेशन सबमीट करू शकतात.

महाराष्ट्रात कुठे आणि किती पदे?

✓ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड – 85
✓ पुणे – 25
✓ औरंगाबाद आणि जळगाव – 06
✓ नागपूर – 04
✓ कोल्हापूर आणि सांगली – 10
✓ नाशिक – 04
✓ रत्नागिरी – 02

✓ अन्य राज्यातील पदे
गुजरात – 06
कर्नाटक – 04
गोवा-04

पदासाठीची पात्रता :

सारस्वत बँक ज्युनिअर ऑफिसर पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कॉमर्स किंवा मॅनेजमेंटमधून किमान ६० टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण झालेला असावा किंवा कॉमर्स अथवा मॅनेजमेंट विषयांमध्ये किमान ५० टक्के गुणांसह मास्टर्स डिग्री असलेले उमेदवार यासाठी पात्र असतील.

वयोमर्यादा :

फेब्रुवारी २०२१ ला किमान २१ वर्षे आणि कमाल २७ वर्षे वय असावे.

निवड प्रक्रिया :

सारस्वत बँकेत ज्युनिअर ऑफिसर पदासाठीची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतींच्या आधारे होणार आहे. पहिल्या टप्प्यात १६० मिनिटांची ऑनलाइन परीक्षा असेल. या चाचणीत जनरल / फायनान्शिअर अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग ऍबिलीटी आणि कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड या विषयांवर १९० प्रश्न विचारले जातील. परीक्षा २०० गुणांची असून कमीत कमी ५० गुण मिळवणारे उमेदवार पात्र ठरतील. परीक्षेच्या आधारे तयार होणाऱ्या मेरीट लिस्टनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

पदासाठीच्या अर्जाचे शुल्क :

७५० रुपये आहे आणि हे शुल्क ऑनलाइन भरायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *