अनेक नवीन रेकॉर्ड करणाऱ्या KGF चित्रपटाची रीलिजची तारीख ठरली..!

| मुंबई | ‘केजीएफ’ (K.G.F) या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरला प्रेक्षकांकडन उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहात आहेत. परंतु चित्रपटाच्या निर्मात्यांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात आणि सोशल मीडियावर अभिनेता यशला, या चित्रपटातील कलाकारांना आणि दिग्दर्शक-निर्मात्यांना एकच प्रश्न विचारला जात होता की, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे? त्यासाठी आता प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

चित्रपट व्यापार समीक्षक तरण आदर्श यांनी एक ट्विट करुन केजीएफ 2 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यशचा हा बहुप्रतीक्षित चित्रपट 16 जुलै 2021 रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात सुपरस्टार यशसोबत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री रवीना टंडन, अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून, चित्रपटाचे चाहते बर्‍याच दिवसांपासून याची वाट पाहत आहेत.

सुरूवातीला चित्रपटाच्या भारतात 2000 प्रिंट्स जाहीर केला होत्या, आता त्या दुप्पट करण्यात येणार आहेत. केवळ कन्नड, हिंदी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम भाषेतच हा चित्रपट प्रदर्शित होणार नसून आता हा चित्रपट बऱ्याच परदेशी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी यशने चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. या पोस्टरमध्ये यशच्या तोंडात सिगारेट आहे आणि एका हाताने काहीतरी जड ओढून उभे राहण्याचा प्रयत्न करताना तो दिसत होता. हे पोस्टर शेअर करताना यशने लिहिले होते, ‘साम्राज्य पुन्हा तयार करताना…’

चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रवीना टंडन रामिका सेन नावाच्या नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. केजीएफ चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट 16 जुलै 2021 रोजरी प्रदर्शित होईल.

चाहत्यांना चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची लोक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्याच्या निमित्ताने संजय दत्त आणि यश हे दोन्ही सुपरस्टार पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. सूत्रांनी सांगितले की, ‘असं अजिबात वाटत नाहीये की, यश आणि संजू बाबा पहिल्यांदा एकत्र शूट करत आहेत. शूटींगदरम्यान दोघे चांगलेच सहज झाले होते. दोघांनीही शूटींग एन्जॉय केलं.

Leave a Reply

Your email address will not be published.