हे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ ऑक्सिजन ची पातळी वाढविण्यासाठी आहेत महत्वाचे..!

| मुंबई | कोरोना विषाणूमुळे सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या संकट काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि मनोबल टिकवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपण कोरोनासारख्या विषाणूवर निश्चितच मात करु शकतो. त्यामुळे सध्याच्या काळात जास्तीत जास्त सकस व पौष्टिक पदार्थांचं सेवन करुन आपली इम्युनिटी पॉवर म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. त्याचसोबत शरीरातील ऑक्सिजनची पातळीदेखील स्थिर राहिल याकडे लक्ष दिलं पाहिजे. विशेष म्हणजे रक्तातील ऑक्सिजनची पातळी स्थिर राहणं गरजेचं आहे. म्हणूनच रक्तातील ऑक्सिजनची पातळी कायम ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा. तसंच रक्तातील ऑक्सिजन शरीरात कशाप्रकारे कार्य करतं ते पाहुयात.

हॉर्वर्ड हेल्थ आणि अमेरिकेच्या फूड अॅण़्ड अॅडमिनिस्ट्रेशननुसार, शरीरात हिमोग्लोबिनची मात्र योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी कॉपर, आयरन, व्हिटामिन ए, व्हिटामिन बी २, व्हिटामिन बी ३,व्हिटामिन बी ५,व्हिटामिन बी ६, फॉलिक अॅसिड, व्हिटामिन बी १२ या घटकांची आवश्यकता असते. यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळीही वाढते.

रक्तातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे हिमोग्लोबिन. रेड ब्लड सेल्समधील या प्रोटीनच्या माध्यमातून फुफ्फुसांपासून ते शरीरातील अन्य अवयवयांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो व तेथून कार्बन डायऑक्साइड बाहेर खेचला जातो. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे असे काही शाकाहारी व मांसाहारी पदार्थ आहेत, ज्यांच्या मदतीने आपण आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन व ऑक्सिजनची पातळी वाढवू शकतो.

मांसाहारी

१. मांसाहार करणाऱ्या व्यक्तींनी शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी ओएस्टर म्हणजे कालव्यांचा ( शिंपले) आहारात समावेश करावा. कारण, ९० ग्रॅम कालव्यांमध्ये २४५ टक्के कॉपर असतं.

२. ९० ग्रॅम खेकड्यांमधून ३० टक्के कॉपर मिळतं.

३. कोंबडी,बकरा, बदक आणि कालवे यांच्यात आयरन असतं.

४. मांसाहार पदार्थांमधून जवळपास ५२ टक्के आयरन मिळत असतं.

५. अंडी व मटण यामधून व्हिटामिन ए आयरन मिळतं.

६. चिकन, मासे व अंडी यामधून व्हिटामिन बी ५ मिळतं.

शाकाहारी

१. चॉकलेट, बटाटे,तीळ, काजू,मशरूम यांचा आहारात समावेश करावा. या पदार्थांमध्ये कॉपरची मात्र पुरेपूर असते.

२. ३० ग्रॅम चॉकलेटमधून शरीराला लागणारी ४५ टक्के कॉपरची कमतरता दूर होते.

३. शेंगभाजी, हिरव्या पालेभाज्या, डाळी व मटार यांचा आहारात समावेश करावा.

४. रताळं, गाजर, दुधी भोपळा, आंबा, पालक यांचं सेवन करावं.

५. व्हॅनिला आईस्क्रीममधून व्हिटामिन ए मिळतं.

६. ओट्स, दही, दूध, बदाम, पनीर, ब्रेड, सफरचंद, सुर्यफुलाच्या बिया, टोमॅटो याममधून रायबोफ्लेविन मिळतं.

७. मशरुम, सुर्यफूलाच्या बीया, बटाटे, भुईमुगाच्या शेंगा, अॅव्होकॅडो, ब्रोकोली, ब्राऊन राईस, ओट्स, पनीर या पदार्थामधून ८ टक्क्यांपासून ५२ टक्क्यांपर्यंत व्हिटामिन बी ५ मिळतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *