या माजी आरोग्य मंत्र्यांनी घेतली महाराष्ट्रात पहिली कोरोना लस..

| मुंबई | मुंबईमध्येही कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी मुंबईमध्ये ४१०० आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध व्हॅक्सीनेशन केंद्रांवर ‘कोविशील्ड’ आणि ‘को-व्हॅक्सीन’चा पहिला डोज दिला जाईल. याच्या २८ दिवसांनंतर दुसरा डोज देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. मुंबईमध्ये माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेना आमदार डॉ. दीपक सावंत आणि त्यांच्या पत्नीला कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोज देण्यात आला.

मुंबईमध्ये माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेना आमदार डॉ. दीपक सावंत आणि त्यांच्या पत्नीला कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोज देण्यात आला.

मुंबईमध्ये माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेना आमदार डॉ. दीपक सावंत आणि त्यांच्या पत्नीला कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोज देण्यात आला.

मुंबईमध्ये व्हॅक्सीन अपडेट

✓ कुर्लामध्ये बीएमसीच्या नर्स स्नेहल राणे (५७) यांना मुंबईच्या सर्वात मोठ्या बीकेसी केंद्रात सर्वात पहिले लस देण्यात आली.
✓ घाटकोपरमध्ये गणेश नगर हेल्थ ऑफिसमध्ये आरोग्यकर्मचारी सुरेखा पारद (४७) यांना सर्वात पहिले राजवाडी रुग्णालयात लस देण्यात आली.
✓ मुंबईच्या कपूर हॉस्पिटलमध्ये माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार डॉ. दीपक सावंत आणि त्यांच्या पत्नीला पहिली लस देण्यात आली. दोघे पति-पत्नी डॉक्टर आहेत.
✓ ठाण्यात वार्ड बॉय राहुल शेळकेला पहिला डोज
✓ मुंबईच्या कपूर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्यकर्मचाऱ्यांनी टाळी, आरती आणि फुलांचा वर्षाव करत व्हॅक्सीनचे स्वागत केले.
✓ आज होणाऱ्या पहिल्या लसीकरणासाठी सर्व केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तात एक दिवसपूर्वीच व्हॅक्सीनचे डोज कोल्ड बॉक्समध्ये पोहोचवण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *